Published On : Fri, Aug 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात गुन्हे शाखेची कारवाई; एमडी ड्रग्ससह तिघे जेरबंद, ३०.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

Advertisement

नागपूर : शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात नागपूर गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ससह तिघा आरोपींना अटक केली. अमली पदार्थविरोधी पथक आणि सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण ३० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असून त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

पहिली कारवाई गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेवाडा रिंग रोडवरील स्टार मोटर्स मल्टी कार वर्कशॉपसमोर करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे अमली पदार्थविरोधी पथकाने दानिश खान अबरार खान आणि मुकर्रम मुनावर अली काझी या दोघांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून एमडी पावडर, दोन मोबाईल फोन आणि एक स्कॉर्पिओ वाहन जप्त करण्यात आले. या कारवाईत सुमारे १७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

चौकशीत या रॅकेटशी संबंधित सय्यद इरफान अली हा आरोपी फरार असल्याचे समोर आले. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असून त्याच्या अटकेसाठी पोलीस विविध ठिकाणी सातत्याने छापेमारी करत आहेत.

दरम्यान, सामाजिक सुरक्षा विभागाने दुसरी कारवाई हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू नरसाळा रोडवरील शासकीय धान्य दुकानासमोर केली. या कारवाईत सलीम साजिद खान याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एमडी पावडर, दोन मोबाईल फोन, दुचाकी, सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम असा १३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Advertisement

दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांत एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांचा पुरवठा कुठून होत होता, या रॅकेटमागे कोणती टोळी कार्यरत आहे आणि आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा पोलीस सखोल तपास करत आहेत. सलग होत असलेल्या या कारवायांमुळे शहरातील अमली पदार्थ तस्करांवरील पोलिसांचा फास आणखी आवळला जात असल्याचे चित्र आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.