Published On : Mon, Jun 15th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ड्रग्स रॅकेटवर क्राइम ब्रांचचा मोठा प्रहार; 65 ग्रॅम एमडीसह चौघांना अटक

8.80 लाखांचा मुद्देमाल जप्त
Advertisement

नागपूर : शहरात वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने धडक कारवाई करत 65 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ससह चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी अमली पदार्थ, मोबाईल फोन आणि दोन दुचाकींसह सुमारे 8 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरातील ड्रग्स नेटवर्कमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरहरी नगर परिसरात काही जण अमली पदार्थांच्या व्यवहारासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एनडीपीएस पथकाने सापळा रचला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या चार युवकांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 65 ग्रॅम एमडी ड्रग्स आढळून आले.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या प्रकरणात पियुष मलवंडे, राहुल गोराडे, आर्य गोरेले आणि मनीष दुर्वे यांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान मुख्य आरोपीने फरार असलेल्या एका तस्कराकडून ड्रग्स खरेदी केल्याची बाब समोर आली असून पोलिसांनी त्या आरोपीचा शोध सुरू केला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी काहींवर यापूर्वीही आर्म्स अ‍ॅक्ट, एनडीपीएस कायदा आणि मारहाणीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे हे आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

पोलिसांनी आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. शहरात अमली पदार्थांची विक्री आणि पुरवठा करणाऱ्या टोळ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा गुन्हे शाखेने दिला आहे. नागपूरमध्ये ड्रग्सविरोधातील ही अलीकडच्या काळातील महत्त्वाची कारवाई मानली जात असून, यामुळे शहरातील अमली पदार्थांच्या साखळीबाबत आणखी धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.