Published On : Thu, Jul 2nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात एमडी ड्रग्जविरोधात क्राइम ब्रांचची धडक कारवाई; दोघांना अटक, 1.40 लाखांचा मुद्देमाल जप्त

Advertisement

नागपूर : शहरातील अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीविरोधात नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट-2 ने मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजुमन कॉलेज परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून 5 ग्रॅम एमडी ड्रग्जसह मोबाईल फोन आणि मोपेड असा एकूण 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने हल्दीराम मार्ग परिसरात सापळा रचला. पंचांसमक्ष झडती घेतल्यानंतर आरोपींकडून सुमारे 30 हजार रुपये किमतीचे 5 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले.

या कारवाईत सचिन सुनील विश्वकर्मा आणि जोएब शहाबाज कुरेशी या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून दोन मोबाईल फोन आणि एक मोपेडही जप्त करण्यात आली.

या प्रकरणी दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान ‘गुप्ता’ नावाचा मुख्य ड्रग्ज पुरवठादार असल्याची माहिती समोर आली असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

Advertisement

या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून ड्रग्ज तस्करीच्या संपूर्ण नेटवर्कचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखा तपास करत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.