Published On : Fri, Oct 3rd, 2025
By Nagpur Today Nagpur News

इटलीतील भीषण अपघातात नागपूरच्या गुलशन प्लाझा मालक दांपत्याचा मृत्यू!

मुलगी गंभीर जखमी; दोन लहान मुले सुखरूप
नागपूर : इटलीतील ग्रोसेतो परिसरात झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात नागपूरचे रहिवासी तसेच गुलशन प्लाझाचे (सीताबर्डी फ्लायओव्हरजवळ) मालक जावेद अख्तर आणि त्यांची पत्नी नद्रा अख्तर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कौटुंबिक सहलीदरम्यान हा अपघात घडला.

या दुर्घटनेत दांपत्याची २४ वर्षीय मुलगी गंभीर जखमी असून तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दोन लहान मुले — एक मुलगा व एक मुलगी — यांना सौम्य दुखापत झाली असून ते धोका टळल्याचे समजते.

अपघात इतका भीषण होता की घटनास्थळीच जावेद व नद्रा अख्तर यांचा मृत्यू झाला.

भारतीय दूतावास, इटलीने या घटनेची पुष्टी करत शोक व्यक्त केला आहे. दूतावासाच्या निवेदनात म्हटले आहे :
“नागपूरच्या दोन नागरिकांच्या निधनामुळे आम्ही अत्यंत व्यथित आहोत. जखमी सदस्यांच्या लवकर बरे होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. दूतावास स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत असून कुटुंबाला आवश्यक ती मदत केली जात आहे.”

Gold Rate
4 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,17,900 /-
Gold 22 KT ₹ 1,09,600 /-
Silver/Kg ₹ 1,48,100/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या घटनेने नागपूरच्या व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेषतः सीताबर्डी परिसरात गुलशन प्लाझा ही एक ओळख असल्याने व्यापारी समाजात शोककळा पसरली आहे. नातेवाईक व मित्रपरिवार हादरले आहेत.

दरम्यान, स्थानिक प्रशासन आणि भारतीय दूतावास एकत्रितपणे आवश्यक औपचारिकता पार पाडत असून जखमी मुलीला अत्याधुनिक वैद्यकीय उपचार पुरवले जात आहेत. मृतदेह भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Advertisement
Advertisement