Published On : Mon, Oct 10th, 2022
By Nagpur Today Nagpur News

जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी केली मेट्रोची सफर

Advertisement

नागपूर :नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी काल सहपरिवार मेट्रोने प्रवास केला. जिल्हाधिकारी डॉ. ईटनकर यांनी मेट्रोच्या सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन-लोकमान्य नगर- सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन पर्यंत प्रवास केला. यावेळी महा मेट्रोच्या वतीने त्यांना मेट्रोच्या संपूर्ण कार्याची आणि प्रगतीची माहिती प्रदान करण्यात आली.

नागपूर शहरामध्ये नागपूर मेट्रोच्या रूपात अतिशय चांगली वाहतूक प्रणाली तयार करण्यात आली आहे, आंतराराष्ट्रीय दर्ज्याची पायाभूत सुविधा आज नागपूर शहरामध्ये उपलब्ध आहे हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. याचा जास्तीत नागरिकांनी उपयोग करावा असे मत जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केले. मेट्रोचे तिकीट दर सर्व सामान्य व्यक्तींना परवडणारे आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे शहराच्या कुठल्याही भागातून मेट्रो स्टेशन पर्यंत नागरिकांना पोहोचता येते. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून पैसे वाचविण्यास मदत होत असून पर्यावरणराखण्यास देखील मदत होते.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मेट्रोचा प्रवास सुखकर असून सर्वात सुरक्षित प्रवास असल्याचे आपल्याला जाणवल्याचे सांगितले. रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी, सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांनी मेट्रोचा अधिकाअधिक वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Advertisement
Advertisement
Advertisement