मनपा आणि OCW ने गळती बंद करण्यासाठी टाकली ‘बायपास शस्त्रक्रिये ‘सारखी “बायपास जलवाहिनी
नागपूर: पूर्व नागपुरातील कळमना आणि वांजरी जलकुंभ अंतर्गत येणाऱ्या जवळपास ७२०० अधिकृत ग्राहकांना ( साधारणपणे ४०,००० नागरिक) जे गेल्या वर्षभरापासून पूर्णतः टँकर द्वारे पाणी पुरवठ्यावर अवलंबून होते त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची -पाणीदार बातमी आहे. ह्या सर्व ग्राहकांना (नागरिकांना) आता नळाद्वारे -पूर्ण दाबाने -घरपोच टप्या टप्प्याने पाणीपुरवठा सुरु होत आहे.
गेल्या वर्षभरापासून वांजरी जलकुंभ अंतर्गतअसलेल्या राजीव गांधी नगर, संतोष नगर, कुंदनलाल गुप्ता नगर, विनोबा भावे नगर, नागसेनवन , वनदेवी नगर, बेले नगर, कामना नगर, वैभव लक्ष्मी नगर, मेमन कॉलोनी, वैष्णोदेवी नगर गुलशन नगर, पांडुरंग नगर, बबळेश्वरी नगर , देवी नगर, त्रिमूर्ती नगर आणि वांजरी जुनी वस्त आणि कळमना NIT जलकुंभ अंतर्गत : कळमना वस्ती , गणेश नगर, समाज एकता नगर, वाजपेयी नगर, नागराज नगर, म्हाडा कॉलोनी आणि नजीकचा भाग येत असलेल्या जवळपास ७, २०० ते ७, ५०० ग्राहकांना साधारणपणे २३० टँकर ट्रिप्स (नेटवर्क च्या ८० ट्रिप्स आणि नॉन-नेटवर्क च्या १५० ट्रिप्स ) द्वारे पाणीपुरवठा होत होता . त्या मागचे मुख्य कारण म्हणजे ह्या भागांना जोडणारी 700 मी मी व्यासाची मुख्य जलवाहिनी जी वांजरी रेल्वे ट्रॅक खालून जाते त्यामध्ये मध्यभागी उदभवलेली मोठी गळती, हे होते . ह्या सर्व भागांना आता सुरळीत पाणीपुरवठा टप्या टप्याने सुरु झालेला आहे आणि काही भागात टप्याटप्याने सुरु होणार आहे .
नागपूर महानगपालिकेने आणि OCW ह्यांनीं सतरंजीपूरा झोन अंतर्गत येणाऱ्या ह्या भागात उदभवलेली हि गळती थांबविण्यासाठी रेल्वे विभागाच्या अधिकाऱयांच्या सहकार्याने बरेच प्रयत्न केले . गळती शोधण्यासाठी जलवाहिनीच्या आत कॅमेरा तसेच तांत्रिक टीम मेंबर ला देखील पाठविण्यात आले . गळती हि ३ ट्रॅक मधील मधल्या ट्रॅक खाली आढळून आली जिथे खोदणे आणि गळती बंद करणे हे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत जिकिरीचे ठरणारे होते तसेच त्याद्वारे ३ ट्रॅक असलेल्या मुख्य रेल्वे ट्रॅकवर देखील फार मोठा धोका देखील उध्दभवण्याचे चान्सेस होते.
त्यामुळे ज्याप्रकारे हृदयातील रक्तवाहिन्या मध्ये अत्यंत कठीण ठिकाणी असलेले ब्लॉककेज बाय पास रक्तवाहीनी टाकून शस्त्रक्रिया केली जाते आणि हृदयाचा पुरवठा पूर्ववत केल्या जातो….अगदी त्याचप्रमाणे मनपा – OCW वरिष्ठ संचालक गण सुश्री श्वेता बॅनर्जी (ED, NESL), मनोज गणवीर (NESL),, संजोय रॉय (OCW, CEO), राहुल कुलकर्णी (OCW COO), लिओनेल, राजेश कालरा, यांनी संयुक्तपणे अनोखा असा बायपास जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला आणि इतर तांत्रिक अधिकारी यांनी तो यशस्वीपणे अमलात आणला. ज्यायोगे:ज्यायोगे रेल्वे ट्रॅक खाली असलेली मुख्यवाहीवरील मोठी गळती आपोआप बंदच होईल आणि रेल्वे मार्गाला काही क्षती देखील होणार नाही आणि कळमना आ णि वांजरी जलकुंभ क्षेत्रातील नागरिकांना पर्याप्त आणि पूर्ण दाबाने घरपोच नळाला पाणीपुरवठा देखील टप्या टप्याने सुरू होईल .
नुकतीच, नागपूर महानगर पालिका आणि OCW ह्यांनीं ह्या वांजरा रेल्वे ट्रॅक च्या सभोवताल जवळपास ४५० मीटर लांबी असलेली ४५० मी, मी व्यासाची नवीन बाय -पास जलवाहिनी टाकली आणि त्याला मुख्य ७०० मी मी व्यासाची जलवाहिनीला जोडण्यासाठी, नवीन वाहिनी चार्ज करण्यासाठी तसेच वांजरा रेल्वे लाईन खाली असलेली जुनी जलवाहिनी (मोठी गळती असलेली) कायमस्वरूपी बंद करण्यासाठी २४ तास अवधी चा शटडाऊन घेतला होता. ह्या अंतर्गत बायपास जलवाहिनी (आधी टाकलेली) रेल्वे ट्रॅकच्या डाव्या आणि उजव्या च्या दोन्ही भागांना जोडण्यात आली आणि कळमना आणि वंजारी जलकुंभाचा पाणीपुरवठा पूर्णपणे , पूर्ण दाबाने सुरु करण्यात आला. नवीन बनलेले कळमना जलकुंभ पूर्णपणे वापरणे हा देखील बऱ्याच काळापासून एक प्रलंबित विषय होता आता जलवाहिनी चार्जे झाल्यामुळे कळमना जलकुंभ अंतर्गत येणाऱ्या जवळपास २५०० ग्राहकांच्या नळांपर्यंत टप्या टप्याने पाणीपुरवठा होणार आहे . आणि जवळपास २३० टँकर ट्रिप्स (नेटवर्क च्या ८० ट्रिप्स आणि नॉन-नेटवर्क च्या १५० ट्रिप्स ) ह्या भागात कमी होण्यास मदत होणार आहे.