Published On : Sat, Jan 11th, 2020

नागपुरातील दुसऱ्या सीएनजी स्थानकाचे गडकरींच्या हस्ते उद्घाटन

नागपूर महानगरपालिकेच्या ताफ्यातील डिझेलवर चालणाऱ्या जुन्या बसेस मध्ये सीएनजी कीट लावून त्यांचे आयुष्य 15 वर्षाने वाढले आहे. मनपाचे डिझेल बस मुळे होणारे वार्षिक 60 कोटी रुपयांचे नुकसान सीएनजी मुळे भरून निघेल. सीएनजी व एलएनजीच्या वापरामूळे नागपुर शहर प्रदूषण मुक्त होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते, वाहतूक महामार्ग मंत्री आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केला. स्थानिक अमरावती रोडच्या वाडी परिसरात दुसऱ्या सीएनजी स्थानकाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपमहापौर श्रीमती मनिषा कोठे ,परिवहन सभापती नरेंद्र बोरकर , रामॅट कंपनीचे सुब्बाराव व कौस्तुभ गुप्ता उपस्थित होते.

कृषी मधील टाकाऊ सामग्री व जैव भारापासून बायो सीएनजी निर्मितीसाठी आपण प्रयत्नशील असून सुमारे 49 टन प्रति दिवस बायो सीएनजी उत्पादन करणाऱ्या प्रकल्पाचे काम सुद्धा सुरू असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

Gold Rate
13 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,800 /-
Gold 22 KT ₹ 1,02,100 /-
Silver/Kg ₹ 1,29,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गडकरींनी यावेळी एलएनजीवर संचालित एका ट्रकला यावेळी हिरवी झेंडी दाखवली. एलएनजी हे 48 रुपये प्रति लिटर असून डिझेलच्या प्रति लिटर 72 रुपयाच्या तुलनेत ते स्वस्त आहे. नागपुरातील लांब प्रवास करणारे मालवाहू ट्रक्स हे एलएनजी वर रूपांतरित करण्यात येतील यामुळे या ट्रकचे अ‍ॅवरेज सुद्धा वाढेल ,असे त्यांनी सांगितले.

इथेनॉल ,मिथेनॉल, बायोडिझेल, सीएनजी यांच्या वापरामुळे पेट्रोलियम वर होणारी सुमारे 80 लाख कोटी रुपयाची निर्यात वाचेल असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

इथेनॉलवर संचालित टीव्हीएस कंपनीची दुचाकी आता आली आहे. सीएनजी संचालित मोटरसायकलवर सुद्धा पाच हॉर्स पॉवर एवढा पंप चालू शकेल असा प्रयोग सुद्धा होत आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे ,अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

नागपूर शहरातील पहिले मदर सीएनजी स्टेशन हे कामठी रोडवर संचालित असून वाडी परिसरात असणारे हे शहरातील दुसरे स्टेशन आहे . या सीएनजी स्टेशनच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तांत्रिक शिक्षण घेणा-या युवकांना रोजगार प्राप्त होईल, असेही गडकरी यावेळी म्हणाले.

या कार्यक्रमास नागपूर मनपा, रामॅट कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement