नागपूर : ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेल्या औषध विक्रीविरोधात नागपुरातील औषध विक्रेत्यांनी बुधवारी तीव्र आंदोलन छेडले. संविधान चौक येथे मोठ्या संख्येने एकत्र येत व्यापाऱ्यांनी ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक मेडिकल स्टोअर्सही बंद ठेवण्यात आले होते.
औषध विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, ऑनलाईन औषध विक्रीमुळे स्थानिक मेडिकल व्यवसायावर मोठा परिणाम होत असून अनेक छोट्या विक्रेत्यांपुढे आर्थिक संकट उभे राहत आहे. तसेच डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे विकली जाण्याचा धोका वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशीही खेळ होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
संविधान चौकात झालेल्या आंदोलनात व्यापाऱ्यांनी घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ऑनलाईन औषध विक्रीवर कठोर नियम लागू करावेत आणि अनियंत्रित विक्री तातडीने थांबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, आंदोलनामुळे शहरातील अनेक भागांतील मेडिकल स्टोअर्स बंद असल्याने नागरिकांना काही प्रमाणात गैरसोयीचाही सामना करावा लागला. मात्र, औषध विक्रेत्यांनी हा लढा व्यवसाय आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असल्याचे सांगितले.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...
नागपुर के बार के बाहर मिर्च पाउडर डालकर युवक पर चाकू से...
हुडकेश्वर में चोरों का पर्दाफाश! 10 घरफोड़ियां सुलझीं #NagpurNews #NagpurCrime #Hudkeshwar #CCTV
नागपुर में कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग! #NagpurNews #NagpurFiring #Wathoda...
मेहकर में सड़क पर महिला की डिलीवरी! #BuldhanaNews #MehkarNews #HospitalNegligence #MaharashtraNews





