Published On : Sat, Oct 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात गांधी घराण्याच्या नावाने भाजयुमोकडून पिंडदान; राहुल गांधींवर दयाशंकर तिवारींची टीका

Advertisement

राज्यातील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांत अन्नधान्याचा पुरवठा तातडीने करा;मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

नागपूर : सर्वपित्री अमावस्येचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चाच्या नागपूर महानगर शाखेने नेहरू-गांधी परिवारातील दिवंगत नेत्यांच्या नावाने पिंडदान आंदोलन केले. सीताबर्डीतील व्हरायटी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याखाली हा धार्मिक विधी पार पडला. भाजयुमोचे शहराध्यक्ष सचिन करारे आणि युवती प्रमुख प्रशंसा भोयर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या नावाने पिंडदान करण्यात आले.

या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना भाजपचे नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुढील पिढीने योग्य प्रकारे उत्तरकार्य केले नसावे, अशी शक्यता व्यक्त करत त्यांनी पितृदोषाचा संदर्भ दिला. राहुल गांधी यांच्या मानसिक स्थितीवरही त्यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली. राहुल गांधी यांनी राष्ट्रहिताच्या दृष्टीने काम करावे, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केल्याचे तिवारी यांनी सांगितले.

दिवंगत राष्ट्रीय नेत्यांच्या नावाने सार्वजनिक चौकात पिंडदान आणि राहुल गांधी यांच्यावरील वैयक्तिक टीकेमुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात या आंदोलनाची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणावर काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे लक्ष लागले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.