Published On : Tue, Jul 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात नशेच्या व्यसनासाठी दुचाकी चोरी; गणेशपेठ पोलिसांनी तीन जणांच्या टोळीला जेरबंद

Advertisement

नागपूर : नशेचे व्यसन भागवण्यासाठी दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा गणेशपेठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दोन दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या दोन्ही दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या टोळीने शहरात आणखी किती वाहनचोऱ्या केल्या आहेत, याचा तपास सुरू आहे.

तक्रारदार ॲड. सार्थक सुदर्शन चौरसिया (रा. सरस्वती भवन, घाट रोड, विजय टॉकीज परिसर) यांनी घरासमोर उभ्या असलेल्या दोन दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार गणेशपेठ पोलिसांकडे नोंदवली होती. तपास सुरू असताना पोलिसांचे पथक गस्त घालत असताना बसस्टॉपजवळ आमिर बशीर शेख हा संशयास्पद दुचाकीसह आढळून आला. वाहनाची कागदपत्रे मागितल्यावर तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. चौकशीत संबंधित दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिसांनी कसून चौकशी केली असता आमिरने साथीदार अजीज अयूब खान आणि आकिब शकील शेख यांच्या मदतीने दोन्ही दुचाकी चोरल्याची कबुली दिली. आरोपींच्या निशाणदेहीवरून चोरीच्या दोन्ही दुचाकी जप्त करण्यात आल्या. तपासात तिघेही अमली पदार्थांच्या व्यसनाधीन असल्याचे समोर आले असून नशेची गरज भागवण्यासाठी ते वाहनचोरी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विशेष म्हणजे, पहिली दुचाकी चोरल्यानंतर आरोपींनी ती झाशी राणी चौकातील पेट्रोल पंपामागे लपवून ठेवली होती. दरम्यान, चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते. त्याच धाग्याच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. एवढेच नव्हे, तर पहिली दुचाकी चोरल्यानंतर आरोपी पुन्हा त्याच घरासमोर आले आणि दुसरी दुचाकीही लंपास केली.

Advertisement

गणेशपेठ पोलीस आता तिन्ही आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची पडताळणी करत असून शहरातील इतर वाहनचोरीच्या घटनांमध्येही या टोळीचा सहभाग आहे का, याचाही सखोल तपास सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.