Published On : Tue, Jul 28th, 2020

भारत बायोटेक निर्मित कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचणीला नागपुरात सुरुवात

Advertisement

नागपूर: नागपूरच्या गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ज्या स्वयंसेवकांना कोव्हॅक्सिन देण्यात आलं आहे ते या प्रक्रियेत सहभागी होऊन आनंदित आहेत.

सखोल आरोग्य चाचणीतून या बहुप्रतिक्षित लसीच्या चाचणीसाठी आमची निवड झाल्यामुळे आनंद होत असल्याची भावना दोन स्वयंसेवकांनी एबीपी माझाकडे व्यक्त केली.

जणू आम्ही देशाच्या कामी येत आहोत, या भावनेतून एका सैनिकासारखे वाटत असल्याचे त्यांचं मत आहे.

आम्हाला कोणतेही खास पथ्य पाळण्यास सांगितलेले नाही, त्यामुळे आम्ही सामान्य आयुष्य जगू शकतो आहे असं मत लस देण्यात आलेल्या स्वयंसेवकांनी व्यक्त केलं आहे.