Published On : Tue, Jul 21st, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात घरात लपवून ठेवलेला ९७ किलोचा प्रतिबंधित गुटखा जप्त; गुन्हे शाखेची कारवाई, एकाला अटक!

Advertisement

नागपूर : शहरात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी तंबाखूची अवैध साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरोधात नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल ९७ किलो ३०० ग्रॅम प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पानमसाला जप्त करण्यात आला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, नूरी मशिदीजवळील टिपू सुलतान चौक परिसरातील एका घरात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ छापा टाकून घराची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचे पुडे आढळून आले.

कारवाईदरम्यान अलिम नबी अहमद अन्सारी (वय ३६) याला ताब्यात घेण्यात आले. झडतीत डायरेक्टर, जनम, जाफरानी जर्दा, व्ही-१, पान बहार आदी विविध ब्रँडचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाचे एकूण वजन ९७ किलो ३०० ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत ८१ हजार ३७० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या कारवाईवेळी अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकारी रवीना बबन नागले उपस्थित होत्या. त्यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, जप्त करण्यात आलेला प्रतिबंधित गुटखा व तंबाखूचा साठा कुठून आणला गेला होता, त्याचा पुरवठा शहरातील कोणत्या भागात केला जात होता आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

Advertisement

ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) दीपक अग्रवाल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर यांच्या नेतृत्वातील गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केली. शहरातील प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधातील मोहीम पुढेही कायम राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.