Published On : Sat, Oct 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ट्रॅव्हल्सकडून वसुलीचा आरोप; वाहतूक विभागातील API रवींद्र शेडगे निलंबित!

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची कारवाई
Advertisement

नागपूर : खासगी ट्रॅव्हल्स संचालकांकडून कथित वसुली केल्याच्या आरोपावरून नागपूर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कॉटन मार्केट वाहतूक विभागात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक (API) रवींद्र शेडगे यांना निलंबित केले आहे. वाहतूक पोलीस उपायुक्त आदित्य मिरखेलकर यांच्या प्रस्तावासह चौकशी अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

गणेशपेठ परिसरात मोठ्या संख्येने खासगी ट्रॅव्हल्स उभ्या राहत असून, या वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे. याचदरम्यान ट्रॅव्हल्स संचालकांकडून कथित पैसे वसूल केले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या. काही दिवसांपूर्वी कथित वसुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार प्राप्त झाल्याने चौकशीचे आदेश देण्यात आले.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी सहायक पोलीस आयुक्त गिरीश बने यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. चौकशीत रवींद्र शेडगे यांच्याविरोधात कथित वसुलीशी संबंधित माहिती समोर आल्यानंतर निलंबनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानंतर गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, एका नामांकित ट्रॅव्हल्स कंपनीकडून चार हजार रुपये घेतल्याचाही आरोप असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मात्र, या आरोपांबाबत अंतिम निष्कर्ष विभागीय चौकशी आणि पुढील प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.