Published On : Sat, Oct 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या हिंगणा परिसरात दुर्मिळ खवले मांजर आढळले; सर्पमित्रांच्या मदतीने सुरक्षित रेस्क्यू

Advertisement

नागपूरच्या हिंगणा परिसरात दुर्मिळ खवले मांजर आढळले; सर्पमित्रांच्या मदतीने सुरक्षित रेस्क्यू

नागपूर : हिंगणा परिसरातील तिवस्करवाडी येथे ९ ऑक्टोबर रोजी खवले मांजर (पॅंगोलिन) आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर सर्पमित्र मोनू सिंह आणि आकाश मेश्राम यांनी वनविभागाच्या मदतीने या वन्यजीवाची सुरक्षित सुटका केली. रेस्क्यूनंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, तिवस्करवाडी परिसरात एक व्यक्ती फिरत असताना त्याला खवले मांजर दिसले. या दुर्मिळ वन्यजीवाला पाहून परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकतेसह घबराट निर्माण झाली. नागरिकांनी याची माहिती सर्पमित्र मोनू सिंह आणि आकाश मेश्राम यांना दिली. माहिती मिळताच दोघांनी घटनास्थळी धाव घेत वनविभागाला कळवले.

त्यानंतर वनविभागाच्या मदतीने खवले मांजराला सुरक्षितपणे पकडण्यात आले. आवश्यक ती खबरदारी घेत त्याला नैसर्गिक जंगल अधिवासात सोडण्यात आले. या कारवाईनंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

वन्यजीव आढळल्यास त्याला पकडण्याचा किंवा इजा करण्याचा प्रयत्न करू नये. तातडीने वनविभागाला किंवा प्रशिक्षित वन्यजीव बचाव पथकाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येते.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.