Published On : Wed, Nov 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या अमराई जंगलात तरुणीवर अत्याचार; प्रियकराला बेदम मारहाण करून पळवले !

-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत लुटले; सोनेगाव परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Advertisement

नागपूरच्या अमराई जंगलात तरुणीवर अत्याचार; प्रियकराला बेदम मारहाण करून पळवले !

नागपूर :नागपूर शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. सोनेगाव तलावाजवळील अमराई जंगलाच्या निर्जन परिसरात १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोमवारी रात्री फिरण्यासाठी गेलेल्या तरुणी आणि तिच्या प्रियकराला आरोपीने गाठले. प्रियकराला बेदम मारहाण करून पिटाळल्यानंतर आरोपीने तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केला. तरुणीने प्रतिकार करूनही आरोपीने तिच्यावर बळजबरी केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

या घटनेनंतर आरोपीने तरुणीचे व्हिडिओ चित्रीकरण केल्याचा आरोप आहे. तिच्याकडील मौल्यवान वस्तू हिसकावून घेत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला. सुरुवातीला भीतीपोटी जोडप्याने ही घटना कोणालाही सांगितली नाही. मात्र, कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर सुमारे २४ तासांनी पीडित तरुणीने सोनेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी लैंगिक अत्याचार आणि लुटमारीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

अमराई जंगलात असामाजिक तत्त्वांचा वावर?

या घटनेने अमराई जंगल परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. जंगलातील अंधाऱ्या आणि निर्जन भागात असामाजिक तत्त्वांचा वावर असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही पोलिसांकडे केल्या होत्या. या भागात बेकायदेशीर आणि अश्लील कृत्ये होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, अशा तक्रारींनंतरही परिसरात पुरेशी सुरक्षा नसल्याचा मुद्दा आता समोर आला आहे.

Advertisement

गुन्हे शाखा तपासात सक्रिय-

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सोनेगाव पोलिसांसह गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. अमराई परिसरातील प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. संशयित आरोपीचे रेखाचित्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, पीडितेला संशयितांची छायाचित्रे दाखवून ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रतापनगर आणि हिंगणा पोलिसांनाही सतर्क करण्यात आले आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कामाला लागली आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.