Published On : Fri, Oct 23rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

अंबाझरीत जुन्या वादातून खूनी हल्ला; लाकडी दांडक्यानंतर चाकूने वार, आरोपी अटकेत

अजय नगरातील साईबाबा मंदिरासमोरील घटना; दोघांवर हल्ला केल्याचा आरोप
Advertisement

अंबाझरीत जुन्या वादातून खूनी हल्ला; लाकडी दांडक्यानंतर चाकूने वार, आरोपी अटकेत

नागपूर : अंबाझरी परिसरात जुन्या वादातून दोघांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. अजय नगरातील साईबाबा मंदिरासमोर २२ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेत लाकडी दांडक्याने मारहाण केल्यानंतर धारदार चाकूने वार करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आरोपी योगेश दिलीप खंडारे याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार अमोल कावळे आणि आरोपी योगेश खंडारे हे एकाच वसाहतीत राहतात. यापूर्वीही दोघांमध्ये दोन ते तीन वेळा वाद झाल्याचे सांगण्यात येते. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी आरोपी अमोल यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करू लागला. अमोल यांनी याबाबत विचारणा केली असता, आरोपीने त्यांच्याशी मारहाण सुरू केल्याचा आरोप आहे.

यावेळी अमोल यांचे मेहुणे ओमप्रकाश शंकर अवसरे हे मध्यस्थी करण्यासाठी आले. त्यानंतर आरोपीने दोघांवर लाकडी दांडक्याने हल्ला केला. ओमप्रकाश यांनी दांडका हिसकावून घेतल्यानंतर आरोपीने धारदार चाकू काढून त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस आणि उजव्या हातावर वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

या घटनेप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, याबाबत अंबाझरी पोलीस ठाण्याचे पीएसआय प्रशांत गायकवाड यांनी अधिक माहिती दिली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.