
नागपूर :नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ सेवेत आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर सुरू होणार आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक स्मार्ट, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने पाच बसेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर एआय-आधारित स्वयंचलित प्रवासी गणना प्रणाली (Automatic Passenger Counting System) सुरू करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.
परिवहन समितीच्या अध्यक्षा मंगला खेकरे यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारच्या कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाच्या अनुषंगाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यासाठी सविस्तर अहवाल, सल्लागाराची नियुक्ती, निविदा प्रक्रिया आणि आवश्यक प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे.
या नव्या प्रणालीमुळे बसमध्ये चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची स्वयंचलित आणि अचूक नोंद होणार आहे. त्यामुळे तिकीट विक्री आणि प्रत्यक्ष प्रवासी संख्येची पडताळणी सहज होईल. परिणामी महसुलातील गळती रोखण्यास मदत होणार असून, बससेवा अधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सध्या ‘आपली बस’ सेवेत तिकीट तपासणीसाठी ५२ तपासनीस कार्यरत आहेत. नव्या एआय प्रणालीच्या अंमलबजावणीनंतर या मनुष्यबळाची गरज टप्प्याटप्प्याने कमी होण्याची शक्यता असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे तपासणीवरील खर्चातही बचत होईल.
ही प्रणाली विद्यमान इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) आणि इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन (ETM) यांच्याशी जोडली जाणार आहे. यामुळे प्रत्येक मार्गावरील प्रवाशांची संख्या, गर्दीची वेळ आणि बससेवेची मागणी याचे अचूक विश्लेषण करता येणार असून, त्यानुसार बस ताफ्याचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल.
महापालिकेच्या या उपक्रमामुळे नागपूरची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित बनण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जात असल्याचे मानले जात आहे.
SIR प्रक्रिया में गड़बड़ी के आरोप, युवा कांग्रेस आक्रामक #vidarbhanews #nagpur #news...
बकाया बिलों को लेकर ठेकेदारों का अर्धनग्न आंदोलन #nagpurnews #andolan #newsupdate #maharashtranews
सड़क की बदहाली पर छात्राओं की रिपोर्टिंग #maharashtranews #raigad #newsupdate #maharashtra #news
महिला से बैग छीनकर भागने वाला आरोपी 24 घंटे में गिरफ्तार #nagpurnews...
बावनकुळे के हाथों अत्याधुनिक चिकित्सा सुविधाओं का शुभारंभ
राज ठाकरे के सवाल पर रविंद्र चव्हाण ने साधी चुप्पी #vidarbhanews #nagpur...




