
मुंबई/चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील फत्तापूर येथे मोठ्या प्रमाणावर झालेल्या कथित अवैध खनिज उत्खननाची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यास खाण व्यावसायिकांसह संबंधित महसूल अधिकाऱ्यांवरही सामूहिक जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
फत्तापूर येथील सर्व्हे क्रमांक 180 आणि लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन करून शासनाच्या महसुलाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर मंत्रालयात महसूलमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला वरोराचे आमदार करण देवतळे, चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत तसेच महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, संबंधित खाणीसाठी 2 हजार ब्रास उत्खननाचा परवाना असताना ऑक्टोबर 2024 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत तब्बल 33 हजार ब्रास अतिरिक्त आणि अवैध उत्खनन झाल्याचे निदर्शनास आले.
इतक्या मोठ्या प्रमाणावर दिवसाढवळ्या अवैध उत्खनन सुरू असताना स्थानिक महसूल प्रशासन आणि संबंधित अधिकारी काय करत होते, असा सवाल महसूलमंत्री बावनकुळे यांनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी स्पष्ट निर्देश देत सांगितले की, अवैध उत्खननामुळे शासनाचे नुकसान झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित खाण व्यावसायिकासह तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांवर सामूहिक जबाबदारी निश्चित केली जाईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
याशिवाय, अवैध उत्खनन करणाऱ्यांकडून रॉयल्टीच्या पाचपट दंडाची वसुली करण्याच्या सूचनाही महसूलमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे.
SIR प्रक्रिया में गड़बड़ी के आरोप, युवा कांग्रेस आक्रामक #vidarbhanews #nagpur #news...
बकाया बिलों को लेकर ठेकेदारों का अर्धनग्न आंदोलन #nagpurnews #andolan #newsupdate #maharashtranews
सड़क की बदहाली पर छात्राओं की रिपोर्टिंग #maharashtranews #raigad #newsupdate #maharashtra #news
महिला से बैग छीनकर भागने वाला आरोपी 24 घंटे में गिरफ्तार #nagpurnews...
बावनकुळे के हाथों अत्याधुनिक चिकित्सा सुविधाओं का शुभारंभ
राज ठाकरे के सवाल पर रविंद्र चव्हाण ने साधी चुप्पी #vidarbhanews #nagpur...




