Published On : Sat, Aug 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात गांजाची आंतरराज्यीय तस्करी उघड; ३० किलो ८०० ग्रॅम गांजासह दोघांना अटक

Advertisement

नागपूर : ओडिशातून नागपुरात आणण्यात आलेल्या गांजाच्या मोठ्या साठ्यावर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत तस्करीचा डाव उधळून लावला. वाठोडा परिसरातील विहीरगाव बाह्यवळण मार्गावर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ३० किलो ८०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली असून ट्रक, कार आणि मोबाईल असा तब्बल २३ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

अमली पदार्थ विरोधी पथकाला ओडिशातून मोठ्या प्रमाणात गांजा नागपुरात आणला जाणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी विहीरगाव बाह्यवळण मार्गावरील गौरी फॅमिली गार्डनजवळ पाळत ठेवली.

Gold Rate
Sept 10,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 54,700 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,39,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, संशयित ट्रकमधून गांजाची पोती खाली उतरवून एका कारमध्ये भरली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत घटनास्थळी धाड टाकली. झडतीदरम्यान ३० किलो ८०० ग्रॅम गांजा आढळून आला. या गांजाची अंदाजे किंमत ७ लाख ७० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कारवाईत गांजासह आयशर ट्रक, एक कार आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची एकत्रित किंमत सुमारे २३ लाख रुपये आहे.

Advertisement

तपासात ट्रक चालक अमित परतेकी, रा. रामटेक याने ही गांजाची खेप ओडिशातून नागपुरात आणल्याचे समोर आले. तर ही खेप मागविण्यामागे महेश बाबू उर्फ साबिर, रा. हसनबाग याचा सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय आहे. गांजा ताब्यात घेण्यासाठी महेशने त्याचा नातेवाईक शेख सुल्तान उर्फ टीपू अशपाक शेख याला कार घेऊन पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांनी अमित परतेकी आणि शेख सुल्तान उर्फ टीपू या दोघांना अटक केली आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य संशयित महेश बाबू उर्फ साबिर अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसून त्याचा शोध घेण्यासाठी पथकाकडून विविध ठिकाणी तपास सुरू आहे.

या प्रकरणी वाठोडा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, ओडिशातून नागपुरापर्यंत गांजाची ही खेप पोहोचविणाऱ्या संपूर्ण साखळीचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.