Published On : Tue, Oct 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात वडिलांच्या मृत्यूने खळबळ;17 वर्षीय मुलीने लाकडी बॅटने केला हल्ला

दारूच्या नशेत शिवीगाळ आणि जबरदस्तीच्या प्रयत्नाचा आरोप
Advertisement

नागपुरात वडिलांच्या मृत्यूने खळबळ;17 वर्षीय मुलीने लाकडी बॅटने केला हल्ला

नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडील-मुलीच्या नात्याला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत वडिलांनी शिवीगाळ करत मुलीशी जबरदस्तीने जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. याला विरोध केल्यानंतर झालेल्या वादात 17 वर्षीय मुलीने घरातील लाकडी बॅटने वडिलांच्या डोक्यावर वार केल्याची माहिती आहे. गंभीर दुखापतीनंतर 45 वर्षीय वडिलांचा मृत्यू झाला.

मृताची ओळख जयपाल बारेलाल खोलपिटणे अशी झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जयपाल यांना दारूचे व्यसन होते आणि घरात वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे. घटनेच्या रात्री सुमारे 9 वाजता ते दारूच्या नशेत घरी आले. यावेळी त्यांनी मुलीला शिवीगाळ केली तसेच तिच्याशी जबरदस्तीने जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

मुलीने विरोध केल्यानंतर वाद वाढला. यावेळी तिच्यासोबत मारहाण झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर मुलीने घरातील लाकडी बॅटने वडिलांच्या डोक्यावर वार केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात जयपाल गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती पोलिसांना 112 क्रमांकावरून मिळाली. मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला आहे. 17 वर्षीय मुलगी पोलिसांच्या देखरेखीखाली असून, तिच्या अल्पवयीन वयाचा विचार करून नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी एम्स रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.