
नागपूर : मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने नागपूर शहराला अक्षरशः झोडपून काढले. अवघ्या दीड तासात १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाल्याने शहरातील अनेक भाग जलमय झाले. रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली, तर अनेक नागरिकांच्या घरातही पावसाचे पाणी शिरल्याने मोठी गैरसोय झाली.
नरेंद्र नगर परिसरात पावसाचे पाणी थेट घरांमध्ये शिरल्याने रहिवाशांना मोठा फटका बसला. गिट्टीखदानसह शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अनेक प्रमुख मार्गांवर वाहतूक संथ झाली असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन ईटनकर यांनी सांगितले की, शहरात सुरू असलेल्या काही रस्ते विकास कामांमुळे काही ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण झाले. अल्पावधीत १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने परिस्थिती गंभीर झाली. संबंधित रस्ते कामांची चौकशी केली जाईल आणि पाणी साचण्यास जबाबदार आढळणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात येईल.
तसेच, बुधवारी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, विनाकारण घराबाहेर पडू नये आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महानगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि इतर यंत्रणा शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांनी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
युवती के घर में घुसकर अश्लील हरकत #vidarbhanews #nagpur #newsupdate #crimenews #vidarbha
MHT-CET रिजल्ट पर बवाल! #MHTCET #MaharashtraNews #Congress #BJP #DevendraFadnavis #ExamResult
पुलिस कस्टडी से फरार 'इक्का' गिरफ्तार #nagpurnews #Crime #PoliceAction #Arrest #MaharashtraNews
नशे और ऑनलाइन जुए की लत ने बनाया चोर! #Nagpur #NagpurCrime #CrimeNews...
सामान्य सभा स्थगित, विपक्ष का बड़ा आरोप #NagpurNews #NMC #CivicIssues #Budget2026 #Opposition...




