Published On : Mon, Aug 5th, 2019

संकेत बावनकुळे भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष पदी

नागपूर: भारतीय जनता युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी संकेत चंद्रशेखर बावनकुळे यांची आज नियुक्ती करण्यात आली जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी ही नियुक्ती केली असून हा कार्यक्रम कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात आज पार पडला.

याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अजय बोढारे, महामंत्री शशिकांत सिंह, अतील हजारे, ढेंगरे, रवी पारधी, महादुला न.प. अध्यक्ष राजेश रंगारी, लालू यादव व अन्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन युवा मोर्चा कामठी तालुका अध्यक्ष कपिल गायधने यांनी केले.

या कार्यक्रमाला तालुक्यातील युवक कार्यकर्ते कुणाल भोस्कर, रितेश मैद, राकेश काळे, गजानन तिरपुडे, तुषार ढबाले, राहुल बोढारे, बन्सीलाल पोटभरे, अंकित तुरक, गुणवंत माकडे, ऋषभ पोटभरे, विश्वनाथ चव्हाण, वसी जाफरी, कामरान जाफरी, शब्बीर शेख, प्रदीप जोपट, अभिषेक शर्मा, संदेश पटेल, जितेंद्र लोहासारवा, पवन पखिड्डे, आकाश उके, राहुल नागदेवे, जितेश भगत, नेमचंद उदापुरे, गंगांधर सहारे व मोठ्या संख्येने अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.