Published On : Wed, Sep 23rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात 26 -27 सप्टेंबरला ‘NAGCON 2026’; बालरोगतज्ज्ञांची राष्ट्रीय परिषद

Advertisement

नागपुरात 26 -27 सप्टेंबरला ‘NAGCON 2026’; बालरोगतज्ज्ञांची राष्ट्रीय परिषद

नागपूर : अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स, नागपूर शाखेतर्फे ‘NAGCON 2026’ या २२व्या वार्षिक परिषदचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 26 आणि 27 सप्टेंबर 2026 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे ही परिषद पार पडणार आहे.

विदर्भासह महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील बालरोगतज्ज्ञ या परिषदेत सहभागी होणार असून, बालआरोग्याशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. परिषदेत लसीकरणशास्त्र, संसर्गजन्य आजार आणि नवजात बालकांचे आरोग्य यांसारख्या विषयांवर विशेष चर्चा होणार आहे.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

परिषदेत तज्ज्ञांची व्याख्याने, पॅनल चर्चा, प्रश्नमंजुषा, संशोधनपर शोधनिबंधांचे सादरीकरण तसेच विविध आव्हानात्मक वैद्यकीय विषयांवर विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच ‘NAGCON’ची सांस्कृतिक संध्याही विशेष आकर्षण ठरणार आहे.

बालरोग क्षेत्रातील अद्ययावत संशोधन, आधुनिक वैद्यकीय उपचारपद्धती आणि आरोग्यसेवेतील नव्या संकल्पनांवर या परिषदेत विचारमंथन होणार आहे.

Advertisement

परिषदेच्या आयोजनात डॉ. उदय बोधनकर, डॉ. संदीप मोगरे, डॉ. संजय मराठे, डॉ. मुस्तफा अली आणि डॉ. निरव पटेल यांची प्रमुख भूमिका आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.