Published On : Wed, Oct 16th, 2019

माझे मत लोकशाहीला, होय मी मतदान करणार विविध संघटनांतर्फे मतदारांना आवाहन

Advertisement

नागपूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांनी मतदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य पाळावे तसेच “माझे मत अमूल्य असून मी मतदान करणार” असा संकल्प प्रत्येक मतदाराने करावा यासाठी विविध संस्था तसेच संघटनांनी पुढाकार घेतला आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था मतदान जागृतीसाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात आज इंडियन मेडीकल असोशिएशन, चार्टंड अकाऊंटट ऑफ इंडिया (नागपूर शाखा), शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या विविध संघटनांची बैठक जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

Gold Rate
17 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,42,600/-
Gold 22 KT ₹ 1,32,600 /-
Silver/Kg ₹ 2,83,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शहरातील सुमारे 2100 मतदान केंद्रांवर 50 टक्केपेक्षा कमी मतदान झाले होते. विधानसभेसाठी येत्या 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. शहरातील प्रत्येक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी, मतदारांना जागृत करण्याच्यादृष्टीने स्वीप (swip) कार्यक्रमाअंतर्गत प्रशासनातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

मतदारांमध्ये मतदान करण्यासंदर्भात वैद्यकीय व्यावसायिक, सनदी लेखापाल तसेच अभियंत्याची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. वैद्यकीय व्यावसायिकांनी मतदारांना प्रोत्साहीत करण्यासाठी तसेच आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासंदर्भात सामूहीक आवाहन करण्यात येणार आहे. यासाठी आयएमएच्या डॉ.श्रीमती लक्ष्मी श्रीखंडे, डॉ.अल्का मुखर्जी, डॉ.झुनझुनवाला, डॉ.प्रियंका कांबळे, डॉ.इम्रान आदिंनी संघटनेच्यामार्फत जनतेला आवाहन करण्यात येणार असल्याचे सांगितले. मतदान जागृती अभियानामध्ये सहभाग म्हणून प्रत्येक हॉस्पिटल तसेच क्लिनीकमध्ये मतदानासंदर्भात मार्गदर्शन व आवाहन करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

सनदी लेखापालांचा मतदार जागृतीमध्ये सहभाग

मतदार जागृती अभियानामध्ये सनदी लेखापालांच्या संघटनेचा सहभाग राहणार असून विदर्भातील सुमारे 4500 सनदी लेखापाल तसेच 12 हजार विद्यार्थ्यांपर्यंत “मी मतदान करणार” या मोहिमेअंतर्गत दिनांक 21 ऑक्टोबर रोजी मतदान करण्याचा संकल्प करण्यात येणार असल्याची माहिती सनदी लेखापाल संघटनेचे प्रमुख जुल्फेस शाह, अक्षय गुल्हाने, हरीष रंजवानी, जितेंद्र संगवानी, संजय अग्रवाल, साकेत बागडीया आदींनी केले आहे.

यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ.संजीव जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पी.आर.पातुरकर, नागपूर महानगर पालिकेचा आरोग्य उपसंचालक डॉ.भावना सोनकुसरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनीही “मतदार जागृती अभियान” सहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement