| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Oct 16th, 2019

  निवडणूक खर्च निरीक्षक मुरली कुमार यांची माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती कक्षाला भेट

  नागपूर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, आज मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी निवडणूक खर्च निरीक्षक मुरली कुमार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती कक्षाला भेट दिली.

  यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, यांनी निवडणूक खर्च निरीक्षक यांना माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडून करण्यात येणाऱ्या निवडणूक कामकाजाविषयी माहिती दिली.

  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती शैलजा वाघ-दांदळे उपस्थित होते.

  माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडून नागपूर जिल्ह्यातील सर्व 12 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचार आणि प्रसिद्धी साहित्याची छपाईपूर्वी मजकूर तपासणी करणे दृकश्राव्य जाहिरातींची तपासणी करणे, पेडन्यूजसंदर्भातील कार्यवाही करणे, तसेच उमेदवारांकडून आलेल्या अर्जाच्या प्रमाणिकरणाचा दैनदिन अहवाल सादर करण्यात येतो. आदी कामे एमसीएमसी समितीकडून केल्या जातात, अशी माहिती माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी यांनी दिली.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145