Published On : Sun, Jun 23rd, 2019

माझी मेट्रोला सीएमआरएसचे प्रमाणपत्र अप आणि डाऊन मार्गावरील प्रवासी सेवा मध्ये होणार वाढ

नागपूर : मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) तर्फे दिनांक १९ आणि २० जून रोजी रोजी महा मेट्रो नागपूर प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. सीएमआरएस ने केलेल्या पाहणी नंतर अप मार्गाकरिता सीएमआरएसचे प्रमाणपत्र देखील महा मेट्रोने मिळवले असून आता अप आणि डाऊन मार्गावर मेट्रोच्या फेऱ्या मध्ये वाढ होऊ शकतील तसेच प्रवासी सेवेमध्ये देखील वाढ होईल.याआधी डाऊन मार्गावर मेट्रो सेवा सुरू होती आज अप मार्गावर मिळालेल्या प्रमाणपत्रमुळे ट्रॅक ची लांबी वाढली असून प्रवासी सेवे मध्ये देखील निश्चितच वाढ होईल.

सीएमआरएस’च्या तीन सदस्सीय पथकाचे नेतृत्व श्री जणक कुमार गर्ग यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. संपूर्ण दिवस भर चाललेल्या या पाहणी दौऱ्यात महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या कार्याची प्रगती आणि प्रकल्पाबद्दल महत्वाची माहिती सीएमआरएस अधिकाऱ्यांना दिली. तत्पूर्वी सविस्तर माहितीसाठी मेट्रो अधिकाऱ्यांतर्फे ऑडिओ व्हिज्युअल प्रेझेंटेशन सादर करण्यात आले होते.

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यानंतर सर्व प्रथम सीएमआरएस’ने मिहान येथील डेपो’चा दौरा केला. याठिकाणी सीएमआरएस अधिकाऱ्यांनी महत्वाच्या कागदपत्रांची पाहणी करून रोलिंग स्टॉकचे निरीक्षण केली. यात मेट्रोच्या इमर्जन्सी फ्रंट डोअर इव्हॅक्यूव्हेशन, आणि सुरक्षा उपकरणांसह कोचेससंबंधित इतर सर्व उपकरणांची तपासणी केली. डेपोत उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी श्री. जनक कुमार गर्ग यांनी सविस्तर चर्चा करून माहिती जाणून घेतली

यानंतर अनुक्रमे एयरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन, एयरपोर्ट मेट्रो स्टेशन आणि इंटरचेंज मेट्रो स्टेशनची पाहणी केली. प्रवासी सेवेसाठी स्टेशनचे बांधकाम, स्टेशनवर लावण्यात आलेले आटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) गेट्स, अग्निरोधक उपाय, एस्केलेटर, लिफ्ट, विद्युत उपकरणे, टेलिकॉम, आपातकालीन यंत्रणा व इतर सर्व सोयी सुविधांची पाहणी सीएमआरएस’ने केली.

सीएमआरएस पथकाने इंटरचेंज स्टेशन ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रोने प्रवास केला. ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित ब्रेक, आसन व्यवस्था, डिजीटल स्क्रीन, निर्गमन गेट, सवांद कायम ठेवण्यासाठी लावण्यात आलेल्या उपकरणांची पाहणी अधिकाऱ्यांनी केली. या संपूर्ण दौऱ्यासाठी महा मेट्रो नागपूर प्रकल्पाचे संचालक (प्रकल्प) श्री. महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक अँड सिस्टीम्स) श्री. सुनील माथूर, कार्यकारी संचालक(वरिष्ठ मुख्य प्रकल्प अधिकारी) श्री. देवेंद्र रामटेककर, श्री. व्ही के अग्रवाल,श्री. सुधाकर उराडे,श्री.गुरबाणी, महाव्यवस्थापक (प्रशासन) श्री. अनिल कोकाटे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement