Published On : Sun, Jun 23rd, 2019

काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचे सुपुत्र दुष्यंत चतुर्वेदी यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Advertisement

विदर्भातील काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे सुपुत्र दुष्यंत चतुर्वेदी यांनी रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे शिवबंधन बांधून शिवसेनेत स्वागत केले.

नागपूर विद्यापीठातून वाणिज्य शाखेचे पदवीधर असललेले दुष्यंत, नागपूरमधील लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षणसंस्थेचे विश्वस्त म्हणून काम करतात. या शिक्षणसंस्थेच्या मुंबई आणि नागपूरमध्ये २८ हून अधिक शैक्षणिक संस्था असून यात २० हजारांहून अधिक विश्वस्त आहेत.

विदर्भात आणि प्रामुख्याने नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरात शिवसेनेचे नेतृत्व करणारे फारसे नेते नसल्याने चतुर्वेदी यांना शिवसेनेत आणून पक्ष मजबूत करण्यात आल्याचे बोलले जात आहे.