Published On : Fri, Aug 16th, 2019

सहायक आयुक्तांना सांगीतिक निरोप

कलमेश्वर – माजी सहायक आयुक्त व आता कळमेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी कु. स्मिता काळे यांना सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करून महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार यांनी भावपूर्ण निरोप दिला. महाल येथील गांधीसागर तलावाजवळील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला धंतोली झोनच्या सभापती लता काडगाये, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष सि. व्ही. नायडू यांच्यासह धंतोली झोनचे नगरसेवक, नगरसेविका, मनपाचे सर्व सहायक आयुक्त यांची उपस्थिती होती. व्हाइस ऑफ विदर्भ विजेत्या गायिका स्वस्तिका ठाकूर, माजी सहायक आयुक्त राजेश कराडे, सहायक आयुक्त राजू भिवगडे, राजेश गायधनी, सुभाष बैरीसाल, संजय इंगळे, नरेंद्र भांडारकर, पुरूषोत्तम पांडे, गिरीश लिखार, सुनील गजभिये, धीरज शुक्ला, प्रशांत भिंगारे यांनी यावेळी बहारदार गीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एजाज खान व रिजवान साबरी यांनी केले.

याप्रसंगी माजी सहायक आयुक्त स्मिता काळे व सुवर्णा दखणे, निवृत्त सहायक आयुक्त राजेश कराडे , निवृत्त विभागीय अधिकारी राजेश गायकवाड, निवृत्त स्था. अ. सहा. मोहन बिजवार, निवृत्त कर्मचारी नारायण काळे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सहायक आयुक्त गणेश राठोड, उपअभियंता मनोज सिंग, विभागीय अधिकारी धर्मेंद्र पाटील, सहायक अधिक्षक किशोर चरडे, विजय थूल, सुनील गजभिये, राजेश गायधनी, राजेश नागपूरे, सुरेश दामनकर, अरुण तुर्केल, सुभाष बैरीसाल, मनोहर राठोड, विजय काथवटे, प्रकाश निर्वाण, प्रल्हाद पाटील, नरेंद्र भांडारकर, वृषाली पिंपरकर, सागर पवार तसेच सर्व कर्मचारी, अधिकारी , व कॉन्ट्रॅक्टर आदींचे सहकार्य लाभले.