रामटेक : ध्वजारोहणचा मुख्य शासकीय कार्यक्रम प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय रामटेक येथे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांचे हस्ते उत्साहात पार पडला .ह्यावेळी रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी , खणीकर्म विकास महामंडळ चे अध्यक्ष माजी आमदार आशिष जयस्वाल , तहसीलदार नीलिमा रंगारी ,नगराध्यक्ष दिलीप देशमुख, बीडीओ बी .डब्लू .यावले ,सहाय्यक अभियंता सुनील दमाहे , पोलीस निरीक्षक दिलीप ठाकुर , प्रशासकीय अधिकारी व मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
दिवाणी न्यायालयात दिवाणी न्यायाधीश माणिक वाघ यांचे हस्ते तर सह दिवाणी न्यायाधीश व्ही .पी .धुर्वे यांचे प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम पार पडले .ज्ञानदीप कॉनवेंट अँड जूनियर कौलेज , केवल हटवार यांचे हस्ते तर संस्थेचे अध्यक्ष गजेंद्र चौकसे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडले .राष्ट्रीय आदर्श विद्यालयात माजी विद्यार्थी सुनील हूमने यांचे तर संस्थेचे अध्यक्ष आनंदराव देशमुख , प्राचार्य कमल लिखार यांचे प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला .
विद्यासागर कला महाविद्यालय प्रांगणात संस्थेचे अध्यक्ष आशिष जयस्वाल यांचे हस्ते तर संस्थेच्या सचिव अनिता जयस्वाल , प्राचार्य पी .क़े .यू .पिल्लई यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला , भारतीय खाद्य निगम चे माजी सदस्य विजय हटवार यांचे हस्ते जिल्हा परिषद निमखेडा शाळेत ध्वजारोहन कार्यक्रम पार पडला . क्रुषि उत्पन्न बाजार समितीत मुख्य प्रशासक अनिल कोल्हे यांचे हस्ते ध्वजारोहण पार पडले . नरेन्द्र तिडके महाविद्यालयात संगीता टक्कामोरे यांचे हस्ते पार पडले .विविध शाळा ,कार्यालय , संस्था तसेच विविध संघटना तर्फे ध्वजारोहण कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला .