Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jun 5th, 2020

  दगडाने ठेचून अनोळखी तरुणाचा खून

  कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कन्हान नदीच्या तीरावरील हरदास घाटावरील बाबू हरदास एल एन यांच्या समाधी स्थळी एका अनोळखी तरुणाचा दगडाने ठेचुन निर्घृण खून केल्याची घटना आज (5 जून) सकाळी 10 वाजता निदर्शनास आली असून या खुन प्रकरणाचे गूढ रहस्य अजूनही कायम आहे तर यातील मृतक तसेच आरोपी चा अजूनही शोध लागलेला नाही.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटनास्थळ असलेल्या हरदास घाटावर कामठी विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार व जयभीम नाऱ्याचे जनक म्हणून ख्यातिप्राप्त असलेले बाबू हरदास एल एन तसेच बिडी कामगारांचे नेते माजी खासदार ऍड ना. ह. कुंभारे यांची समाधी स्थळ आहे . या पवित्र स्थळी अज्ञात आरोपीनी सदर अनोळखी तरुणाचा अज्ञात कारणावरून दगडाने ठेचून खून केला .

  सदर मृतक तरुणाचा चेहरा पूर्णपणे विद्रुप झाल्याने मृतकाची ओळख पटने हे एक आव्हानच आहे . सदर घटनास्थळी अंदाजे 25 ते 30 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची माहिती आज सकाळी 10 वाजता नवीन कामठी पोलिसाना मिळताच पोलीस उपायुक्त निलोत्पल , एसीपी मुंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे , गुन्हे पोलीस निरीक्षक राधेश्याम पाल, श्वान पथक , ठसेतज्ञ तसेच पोलीस पथकांनी घटनास्थळ गाठले असता एका अनोळखी तरुणाचा मृतदेह अर्धनग्न स्थितीत दिसून आले त्यातच त्याच्या सभोवताल रक्ताचा सडा पसरला होता तर चेहरा हा पूर्णपणे विद्रुप झाला होता तसेच एका बाजूला त्याच्या अर्धनग्न शरीरावरील कपडे , पर्स पडलेला दिसुन आला.

  यासंदर्भात खुनाचे रहस्य उलगडण्याच्या उद्देशाने सदर घटनास्थळाच्या आजू बाजूचा परिसराची पाहणी केली असता पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने एका ठिकाणी कपडे जाळल्याचे दिसून आले तसेच एका झाडाखाली साबण तसेच जुते दिसुन आले.पोलिसांनी सदर सगळे साहित्य जप्त करुन घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नागपूर च्या मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी यासंदर्भात अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 302 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

  -सदर अनोळखी मृतक तरुणाची उंची ही 5फूट 6 इंच असून शरीर सडपातळ, केस काळे आहेत तसेच त्याच्या उजव्या हातावर एल. एस असे गोंदवलेले आहे तेव्हा या शरीराच्या वर्णनातून ओळखीचे असल्याची खात्री पटली असता नवीन कामठी पोलीस स्टेशन शी संपर्क साधावा असे आव्हान डीसीपी निलोत्पल यांनी केले आहे


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145