Published On : Fri, Jun 5th, 2020

प्रदूषण मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकानी वृक्षारोपण करावे

कामठी :-, प्रदूषण मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करून झाडाचे संगोपन करण्याचे आव्हान येरखेडा ग्रामपंचायतचे सरपंच मंगला कारेमोरे यांनी ग्रामपंचायत च्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाच्या पर्वावर आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले

जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमाची सुरुवात सरपंच मंगला कारेमोरे यांचे हस्ते वृक्षारोपण करुन करण्यात आले यावेळी ग्रामविकास अधिकारी जितेंद्र डावरे ,उपसरपंच शोभा कराळे ,ग्रामपंचायत सदस्य नरेश मोहबे,जयश्री ढिवरे, वंदना नाटकंर, सुमेध दुपारे, गजानन तिरपुडे ,प्रवीण लुटे, अनिल भोयर, तरुण घडले, मंगला पाचे,पौर्णिमा बर्वे , नितीन इरपाचे ,घनश्याम नवधीगे उपस्थित होते पाहुण्यांच्या हस्ते ग्रामपंचायत परिसर व न्यूयॉर्क खेडा परिसरात 75 झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन ग्रामविकास अधिकारी जितेंद्र डवरे यांनी केले व आभार प्रदर्शन राजकिरण बर्वे यांनी मानले