Published On : Fri, Apr 2nd, 2021

सैलांब नगर रहिवासी तरुणाचा खून

मृतदेह जमिनीत पुरले

कामठी :-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या सावळी गावातील ढाब्यावर काम करीत असलेल्या दोन नौकरामध्ये श्रेष्ठवादातून झालेल्या क्षुल्लक वादाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने ढाब्यात काम करणाऱ्या आरोपी तरुणाने मित्राच्या मदतीने संगनमताने मृतक गाढ झोपेत असल्याचे निमित्त सांगून ढाब्यातील पावड्यानेच मृतक तरुनाचा खून करून पुरावा मिटविणे तसेच या प्रकरणाचे बिंग न फुटावे या मुख्य उद्देशाने तरुणाचा ढाब्यामगिल राखेत फेकलेला मृतदेह हा तीन दिवसानंतर राखेतून काढून रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीच्या खड्ड्यात मातीत मृतदेह पुरल्याची घटना 31 मार्च ला सकाळी 11 दरम्यान निदर्शनास आली असून खून झालेल्या तरुणाचे नाव सुमित गणपत यादव वय 28 वर्षे रा सैलाबनगर कामठी असे आहे.या खुनाचे रहस्य मौदा पोलिसांनी एकाच दिवसात उलगडले असून चार आरोपीवर भादवी कलम 302, 201, 34 अनव्ये गुन्हा नोंदवित अटक करण्यात आले असून यामध्ये दीपक अरुण त्रिवेदी वय 32 वर्षे रा सुरेखा वार्ड क्र 5 कामठी, आकाश योगेश नारनवरे वय 19 वर्षे, दोन बालविधीसंघरशीत बालक राहणार खापा टोळी तुमसर असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सराईत गुन्हेगार विजय उर्फ टायसन डोंगरे वय 35 वर्षे रा कुंभारे कॉलोनी कामठी याने सहा महिन्यांपूर्वी कामठी तालुक्यात येणाऱ्या सावळी गावातील राजू खंडेलवाल यांच्या शेताजवळ हल्दीराम कंपनीच्या विरुद्ध दिशेला ढाबा उघडून चहा, नाशता तसेच जेवण विक्री करीत होता, कामाच्या शोधात असलेला सदर मृतक सुमित यादव हा दोन महिन्यांपूर्वी ढाब्यावर कामास आला व काम करू लागला तर 15 दिवसानंतर आरोपी दीपक त्रिवेदी हा सुद्धा कामाला आला व काम करू लागला.यातील आरोपी आकाश नारनवरे व सदर दोन विधिसंघरशीत बालक हे नजीकच्या हल्दीराम कंपनीत काम करीत असून नाश्ता तसेच जेवण करण्यास याच ढाब्यावर येत असत .

एक महिन्यांपूर्वी मृतक सुमित ने आरोपी दीपक ला ढाब्यासमोरील ठेवलेल्या राखेवर पाणी मारण्यास सांगितले असता त्यावरून आरोपी दीपक ने मृतक सुमित ला ‘मी तुझा नौकर आहे का?असे सांगून ताकीद दिली यावरून दोघात झालेंल्या मारपिट व भांडणातून सुमित ने दिपकच्या नाकावर हातबुक्की मारल्याने रक्तबंबाळ केले होते ही आपबीती जखमी दीपक ने सदर आरोपी ना सांगितले यावर 4 मार्च रोजी साडे पाच वाजेदरम्यान आरोपी आकाश नारनवरे व दोन विधिसंघरशीत बालक यांनी चहा घेतल्यावर चहाच्या पैसे देण्यावरून वाद घातला दरम्यान सुमित यादव ची वाढती दबंगगिरी लक्षात घेता याला कायमचा संपवून कुणालामाहिती न व्हावी असा नियोजित प्लॅन करून 5 मार्च ला रात्री दरम्यान मृतक सुमित यादव हा गाढ झोपेत असल्याचे संधी साधून सदर आरोपीने ढाब्यामधील पावड्याने त्याच्या डोक्यावर वार करीत त्याच्या उजव्या हातावर वार करून हात वेगळे केले व मान वेगळी करोत जागीच ठार केले व मृतदेह ढाब्याच्या मागे असलेल्या राखेत फेकले मात्र राख उडल्यावर प्रेत समोर येईल व बिंग फुटतील तेव्हा पुरावा नष्ट करणे या हेतूने तीन दिवसानंतर सदर मृतदेह राखेबाहेर काढुन प्रेताचे डोके एका प्लास्टिक च्या जुन्या बोरीत व मानेभोवती गुंडाळून ठेवले व मृतदेह रस्त्याच्याबाजूला असलेल्या नालीत पुरले काल 31मार्च ला काही महिलाना ह्या मृतदेहाचे पाय जमीनिबाहेर दिसताच या प्रकरणाला बिंग फुटले तेव्हा पोलीस पाटील सुधाकर इंगोले यांना पोलिसांनी सदर मृतदेहची माहीती दिली असता मृतदेह पुरले असल्याची खात्री होताच उपविभासगीय पोलीस अधिकारो यांच्या आदेशान्वये नायब तहसीलदार सुनील तरुडकर, पोलीस निरीक्षक खराबे, पोलीस निरीक्षक विजय जाधव , गुमथला प्रा आरोग्य केंद्राचे अधिक्कारी , पोलीस कर्मचारी आदींच्या उपस्थितीत मृतदेह जमिनी बाहेर काढले तेव्हा चेहरा हा पूर्णता कुजलेला होता मात्र मौदा पोलिसांनी तर्कशक्तीच्या आधारावर मृतदेहाची ओळख पटवून आरोपिचा शोध लावून खुनाचे रहस्य उलगडले.

ही यशस्वी कारवाही पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमांतकुमार खराबे यांच्या मार्गदर्शनार्थ पोलिस निरीक्षक विजय जाधव, नितीन आगाशे, सुधीर ज्ञानेश्वर, संतोष तिवारी, निशांत मेश्राम यांनी केली असुन पुढील तपास सुरू आहे