Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Apr 2nd, 2021

  स्मार्ट सिटी च्या स्ट्रीट फॉर पिपल्स चँलेज चे महापौरांच्या हस्ते पुरस्कार वितरीत.

  नागपूर:- नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमीटेड यांनी जनतेला केंद्रस्थानी ठेवून शहराच्या विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय लोकाभिमुख आहे. प्रशासन आणि लोक जर सोबत आले तर विकास कार्याला गती प्राप्त होते, असे विचार महापौर श्री दयाशंकर तिवारी यांनी शुक्रवारी स्मार्ट सिटीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

  नागपूर स्मार्ट सिटीच्या पर्यावरण विभागातर्फे केंद्र शासनाचे गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने विविध उपक्रम नर्चरिंग नेबरहूड, स्ट्रीट फार पीपुल चँलेज, सायकल फार चेंज चँलेज मधे भाग घेणा-या नागरीकांचा महापौर श्री तिवारी यांनी सत्कार केला . कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की प्रशासनाचे निर्णय मध्ये जर नागरिकांचा सहभाग असल्यास त्या निर्णयाला अपेक्षित यश प्राप्त होते. स्मार्ट सिटीच्या माध्यमाने नागरीकांना चांगले जीवनमान देण्याच्या दृष्टीने कार्य सुरू आहे. त्यांनी सांगितले की मनपा नागरीकांसाठी स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन वर्षानिमित्त वंदे मांतरम हेल्थ पोस्ट सामाजिक संस्थाच्या माध्यमाने संचालीत केले जाईल. तसेच मनपाच्या शाळेतील 75 विदयार्थ्यांना जेईई, नीट आणि एन.डी.एस चे प्रशिक्षण खाजगी कोंचिंग क्लासेस च्या माध्यमाने, शहरातील पुतळयांच्या सफाई चे काम एन.एस.एस च्या विदयार्थी करतील. महाविदयातील विदयार्थ्यांना अग्निशमन विभागातर्फे प्रशिक्षण दिले जाईल. लोकसहभागातून हे कार्य पुर्ण केले जातील असे ही त्यांनी सांगितले.

  स्मार्ट सिटी च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस यांनी महापौरांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की महापौरांचा सर्वपरीने स्मार्ट सिटीच्या कार्याला सहयोग प्राप्त होत आहे. स्मार्ट सिटी उत्तम मॉडेल तयार करण्याच्या दिशेने काम करीत आहे आणि देशाच्या इतर स्मार्ट सिटी याचे अनुकरण करतील. या वेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री महेश मोरोणे, कंपनी सचिव श्रीमती भानुप्रिया ठाकूर, पर्यावरण विभागाच्या महाव्यवस्थापक (प्रभारी) डॉ. प्रणित उमरेडकर, डॉ. पराग अर्मळ, डॉ. मानस बडगे, उपस्थित होते.

  महापौरांनी स्ट्रीट फार पीपल चॅलेंजचे निकाल घोषित केले तसेच विजेतांना पुरस्कार देवून त्यांचा सत्कार केला. बाजारपेठ आणि नेबरहूड एरियासाठी पादचा-या साठी अनुकुल आणि पादचा-यांना चालण्यासाठी अनुकुल रस्त्याबद्दल स्पर्धा अयोजित करण्यात आली होती. स्पर्धाचा अयोजन नागपूर स्मार्ट सिटीचा माध्यमाने करण्यात आले होते.

  महापौरांच्या हस्ते फ्लॅगशिप कार्यक्रम स्ट्रीट फॉर पिपल चॅलेंज अंतर्गत प्रथम पुरस्कार सुमित एशिया आर्किटेक्ट, नागपूर आणि दि ब्लँक स्लेट, मुंबई यांना देण्यात आले, दिव्तीय पुरस्कार CSD आर्किटेक्ट यांना देण्यात आले.

  सुमित एशिया आर्किटेक्ट यांनी वर्दळीच्या सिताबर्डी बाजारपेठ येथे पादचा-यांसाठी अनुकुल वातावरण तयार करण्यासाठी सुचना केल्या तसेच श्रीमती मनोरमा बाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांनी सक्करदरा येथे नागरीकांच्या सहभागातून आर्थिक विकास करण्याचे, तलावाचे पुर्नरूज्जीवन, पुरातत्व संवर्धन इत्यादी ची सुचना केली होती. तसेच नागररिकांसाठी सुरक्षित रस्त्यांची संकल्पना मांडली होती.

  नरचरिंग नेबरहुड मध्ये, प्रथम पुरस्कार,SMMCA नागपूरच्या डॉ. प्रिया चौधरी, श्रीमती तन्वी बुरघाटे आणि गौरी राननवरे,The CRUPA नागपूर यांना द्वितीय तर KriselleAfonso, श्रीमती प्रकृती करा-डगी, तृषार शिवनका यांना तृतीय पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमात निशिकांत देशमुख अग्नीपंख फाऊंडेशन, श्री हर्षल बोपर्डीकर, श्रीमती लिना बुधे, श्री जितु गोपलानी, फन प्लॅनेट, श्री कौस्तुभ चॅटर्जी ग्रिन व्हिजील फाऊंडेशन, डॉ. प्रशांत कडू, प्राचार्य, आभा गायकवाड पाटील कॉलेज ऑफ इंजीनीअरींग, प्रो. श्रीमती वंदना खंते, प्राचार्य, तुलसीराम गायकवाड पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्ट, शापुरजी पालोनजी कंपनी, ई पाठशाला, सोलार एक्सप्लोझीव, ऑरेंज ओडीसी यांना सुद्धा प्रमाणपत्र मा. महापौरांच्या हस्ते देण्यात आले.

  कार्यक्रमाचे संचालन डॉ. पराग अर्मळ यांनी केले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145