Advertisement
नागपूर : कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगाराची हत्या करण्यात आली. आतिश उर्फ बाबा राजाराम ठाकरे (वय 26 वर्ष रा. महालक्ष्मी लेआउट प्लॉट क्रमांक 43 कळमना पोलीस चौकी जवळ) असे आरोपीचे नाव आहे.
मृतक हा अगोदर तडीपार होता, त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल होते. कळमना पोलीस व क्राईम ब्रांचची पथके घटनास्थळावर पोहचली असून घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे.
पोलिसांची वेगवेगळी पथके आरोपींच्या शोधात लागली. काही संशयित युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेचा पुढील तपास कळमना पोलीस करीत आहे.
Advertisement