Published On : Mon, Sep 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

आमदार निवासाजवळ २५ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या

सीताबर्डी परिसरात खळबळ; हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट, क्राइम ब्रँचकडून सीसीटीव्ही तपासणी
Advertisement

नागपूर :  सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आमदार निवासाजवळील एका गल्लीत २५ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मृत युवकाचे नाव आकाश सुरेश नेवारे (वय २५, रा. तेलंगखेडी, पोलिस ठाणे अंबाझरी) असे असल्याची माहिती समोर आली आहे. रात्री साडेबारा वाजल्यानंतर ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच सीताबर्डी पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून तपासाला सुरुवात केली आहे.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, आकाश नेवारे याची हत्या नेमक्या कोणत्या कारणातून करण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वाद, पूर्ववैमनस्य अथवा अन्य कोणते कारण यामागे आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

हत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. घटनास्थळी आकाशसोबत कोण होते, तो तेथे कशासाठी आला होता आणि हल्लेखोर कोण होते, याचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement

दरम्यान, मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला असून, शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण आणि जखमांची अधिक माहिती स्पष्ट होणार आहे. हत्येप्रकरणी सीताबर्डी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.