Published On : Sun, Oct 1st, 2017

महापौरांसह मनपा अधिकाऱ्यांनी केली दीक्षाभूमी परिससराची स्वच्छता

Advertisement

नागपूर: ‘स्वच्छता ही आमची जबाबदारी असून माझा घर, माझा परिसर, माझे शहर मी स्वच्छ ठेवीन. इतरांनाही स्वच्छतेचे महत्त्व पटवून देईन’, अशी शपथ उपस्थितांना देत महापौर नंदा जिचकार यांच्यासह मनपाच्या अधिकारी, कर्मचारी व सफाई कर्मचाऱ्यानी हातात झाडू घेऊन दीक्षाभूमी परिसरात साफसफाई केली.

स्वच्छ भारत अभियानान्तर्गत १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान ‘स्वच्छ्ता हीच सेवा’ मोहीम हाती घेण्यात आली होती. या अंतर्गत १ ऑक्टोबर हा ‘श्रेष्ठ स्वच्छ्ता दिवस’ म्हणून पाळण्यात आला. ‘श्रेष्ठ स्वच्छ्ता’ अंतर्गत शहरातील प्रसिद्ध आणि प्राचीन वास्तूची स्वच्छ्ता करण्याचे ठरविण्यात आले होते.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यान्तर्गत दीक्षाभूमी येथे मुख्य कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महापौर नंदा जिचकार यांच्यासह गांधीबाग झोन सभापती सुमेधा देशपांडे, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, कार्यकारी अभियंता डी. डी. जांभूळकर, निगम अधीक्षक राजन काळे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, बाजार अधीक्षक आर. एन. उमरेडकर, सहायक आयुक्त सुवर्णा दखने, अशोक पाटील, गणेश राठोड, प्रकाश वराडे, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेन्द्र उचके, उपअभियंता अमीन अख्तर, रवींद्र मुळे, विभागीय अधिकारी रोहिदास राठोड, अन्न निरीक्षक सुधीर फटिंग, विजय दीक्षित, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खडनवीस, झोनल अधिकारी महेश बोकारे, रंगारी, रक्षमवार यांच्यासह सर्व झोनल अधिकारी, महापौर कार्यालयातील राजेश जामनकर, शुद्धोधन घुटके उपस्थित होते.

झोननिहाय ‘श्रेष्ठ स्वच्छता’

‘स्वच्छता हीच सेवा’ मोहिमेअन्तर्गत ‘श्रेष्ठ स्वच्छता’ दिवस मनपाच्या दहाही झोन मधे पाळण्यात आला. दहाही झोनच्या अधिकारी कर्मचाऱ्यानी दीक्षाभूमीकड़े येणाऱ्या मार्गाची आणि परिसरात श्रमदान करून स्वच्छ्ता केली.

लक्ष्मीनगर झोनअन्तर्गत दीक्षाभूमी आतील बोधीवृक्ष व दीक्षाभूमी समोरील परिसर, स्तुपाच्या मागील लॉ कॉलेज परिसर, धरमपेठ झोन अंतर्गत काचीपुरा चौक ते अलंकार टॉकीज चौक, हनुमान नगर झोन अंतर्गत चोखामेळा चौक ते रहाटे कॉलोनी चौक टी पॉइंट, धंतोली झोन अंतर्गत चोखामेळा चौक ते शततारका अपार्टमेंट (निरी रोड), नेहरू नगर झोन अंतर्गत चोखामेळा चौक ते रहाटे कॉलोनी चौक, गांधीबाग झोन अंतर्गत चोखामेळा चौक ते काचीपुरा चौक, सतरंजीपुरा झोन अंतर्गत काचीपुरा चौक ते चोखामेळा चौक, लकडगंज झोन अंतर्गत कल्पना बिल्डिंग ते बजाजनगर चौक, आशी नगर झोन अंतर्गत चोखमेळा चौक ते लक्ष्मीनगर चौक, मंगळवारी झोन अंतर्गत बजाजनगर चौक ते कल्पना बिल्डिंग चौक आणि मनपा मुख्यालय अंतर्गत दीक्षाभूमी परिसरातील नियंत्रण कक्ष समोरील परिसर श्रमदान करून स्वच्छ करण्यात आला.

Advertisement
Advertisement