Published On : Sun, Oct 1st, 2017

वाडी क्षेत्रात डेंगूच्या आजाराने ४ महिन्याची अश्विनी ही नवजात बालीका ठरली बळी

वाडी (अंबाझरी): वाडी नगर परिषद क्षेत्रात गत २ महिन्यापासून ताप सदृष्य आजार व डेंगू आजाराने थैमान घातले असून वाडी न प व जिल्हा आरोग्य विभागाला वारंवार माहिती देऊनही धडक उपाययोजना न राबविल्याने वाडीत या आजाराने आता जीव घ्यायला सुरुवात केली आहे .15 दिवसापूर्वी नवनीत नगर येथील उदाराम जयराम कळसकर वय ५८ या इसमाचा स्वाइन फ्लूने तर तिन दिवसापर्वी इंद्रायणी नगर येथील १o वर्षीय विद्यार्थीनी आरुषी हेमराज गायकवाड हिचे डेंगूने निधन झाले असतानाच रविवारी पहाटे बक्षी लेआऊट येथील चार महिन्याच्या छोट्या बालिकेलाही डेंग्यू मुळे आपला जीव गमवावा लागला.

स्थानीक पत्रकारांना माहिती मिळताच वॉर्ड नं, 7, बक्षी लेआऊट येथील मृतक बालिकेच्या घरी व परिसरात भेट दिली असता विदारक चित्रं दिसून आले, मृतक बालिका चार महिन्याची आहे .बालिकेचे नाव अश्विनी राहुल बैस आहे, तिचे वडील राहुल बैस यांचे विद्दुत साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे.पत्नी,2 छोट्या मूली व् कुटुंबिया सोबत ते येथे राहतात. त्यांनी सांगितले की अश्विनीला ताप आल्यामुळे 5 दिवसापूर्वी स्थानिक डॉ सुतवणे यांचे कडे उपचारासाठी नेले होते, दोन दिवसा पर्यन्त उपचार करूनही ताप कमी न झाल्याने दत्तवाडी येथील डॉ यादव यांचे दवाखान्यात दाखविले असता त्यांनी तपासणी केली व स्थिती गंभीर असल्याचे सांगून तातडीने नागपूरला भरती करण्यास सांगितले.त्यांचेच मदतीने जनता चौकातील हेल्थ केयर सिटी हॉस्पिटल ला तीला दाखल केले, तिथे रक्ताची तपासणी केली असता डेंग्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला .

त्या दृष्टीने या बलिकेचा उपचार सुरू केला, मात्र रविवारी पहाटे या बालिकेचे निधन झाले, रविवारी सकाळी कुटूबियांनी दुःखी मनाने बलिकेचा टेकडी वाडी स्मशान भूमीत अंतिम संस्कार करण्यात आला, वाडीतील पत्रकार या ठिकाणी पोहचले तेव्हा वार्डतील नागरिकांना माहिती मिळताच मोठ्या संख्येने महिला व नागरिक जमा झाले, त्यांनी वाडी नगर परिषदेचे पूर्ण दुर्लक्ष असल्याचे सांगून नगरसेवक प्रेम झाडे या भागात ढुंकूनही पाहत नाही, ठीक ठिकाणी पाणी साचलेले आहे, फवारणी नाही, फॉगिंग मशीन नाही, कचरा सफाई नाही, असा गंभीर आक्रोशीत आरोप वृंदा बैस, रिता शर्मा,चंदू सावरकर, क्रिश हिरणवार, प्रियका भारद्वाज, सरला नागपुरे, महालया सूर्यवंशी, रत्ना उईके,सुजाता सुखदेवें,उर्मिला उईके, शकुंतला गायधने, सुनंदा भोयर,वच्छला गावंडे,यांनी आक्रोश व्यक्त केला, घटनेची माहिती मिळताच रांका चे नगरसेवक श्याम मंडपे, युवक काँग्रेस चे अश्विन बैस, वाडी शहर काँग्रेस चे अध्यक्ष शैलेश थोराने ई नी घटना स्थळी पोहचून घटना समजावून घेतली व नागरिकसोबत परिसराची पाहणी करून नागरिकांचा आरोप सत्य असल्याचे कथन केले.

श्याम मंडपे यांनी स्पस्ट आरोप केला की नगर परिषदे चे सत्ताधारी, अधिकारी, भाजपचे नेते,आमदार हे फक्त राजकीय फायद्यांच्या कार्यक्रमात मग्न आहेत, वाडीत काही महिन्या पासून डेंग्यू पसरला तरीही सत्ताधारी व अधिकाऱ्यांचे डोळे उघडले नाही. वाडीतील नागरिक डेंग्यू ने त्रस्त झाले असूनही आरोग्याची धडक उपाय योजना न राबविल्याने नागरिकांत मात्र असंतोष पसरला आहे,व तो या स्तराला पोहचला आहे, वाड़ीत शासकीय आरोग्य केंद्र नाही, व्याहड़ केंद्रात सुविधा कर्मचारी नाही, त्याची क्षमता ही नाही, जिल्हा आरोग्य विभाग सुस्त दिसत आहे, आमदारांचे तर पक्ष प्रवेश कार्यक्रमातच पूर्ण लक्ष लागल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे आता सर्व पक्षीय तीव्र आंदोलन किंवा जनहित याचिका दाखल केल्याशिवाय पर्याय दिसून येत नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.तर त्रस्त नागरिकांनी निधनानंतर मदत व सुविधा देन्याएवजी पूर्वी सुविधा दिल्यास बरे राहील अश्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.आता या निधनानंतर तरी वरिष्ट पातळीवर अधिकारी व नेत्यांची झोप उघडते की नाही याकडे त्रस्त नागरिकांचे लक्ष लागले आहे,