Published On : Wed, Jul 31st, 2019

मनपाचे प्रभारी आरोग्य उपसंचालक डॉ. तुमाने यांच्यासह ३२ अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे प्रभारी आरोग्य उपसंचालक डॉ. के.बी. तुमाने, समिती विभागाचे अधीक्षक एस.डी. रोटके, सहायक शिक्षणाधिकारी प्रिती बंडेवार यांच्यासह ३२ अधिकारी व कर्मचारी मनपाच्या सेवेतून निवृत्त झाले. सर्व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचा-यांचा बुधवारी (ता.३१) मनपातर्फे सत्कार करण्यात आला. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहामध्ये आयोजित सेवानिवृत्ती सत्कार कार्यक्रमाला निगम अधीक्षक (साप्रवि) मदन सुभेदार, सहायक निगम अधिकारी दत्तात्रय डहाके, सहायक अधीक्षक मनोज कर्णिक, सहायक निगम अधीक्षक (पेन्शन) नितीन साकोरे, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस आदी उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मनपाचे प्रभारी आरोग्य उपसंचालक डॉ. के.बी. तुमाने, समिती विभागाचे अधीक्षक एस.डी. रोटके, सहायक शिक्षणाधिकारी प्रिती बंडेवार यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचा-यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, तुळशीचे रोप आणि धनादेश प्रदान करुन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस यांनी केले. यावेळी राजू लोणारे, विलास धुर्वे, जयंत भोयर, मकरंद संगमवार, डोमाजी भडंग, दिलीप तांदळे, सुषमा ढोरे, संजय कडू, अंकुश तायडे, पुष्पा चंद्रीकापूरे, रिझवान खान, विष्णू खानोरकर, कैलाश लांडे, शंकर आकनपल्लीवार, दिलीप देवगडे, किशोर तिडके उपस्थित होते.

सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचा-यांमध्ये प्रभारी आरोग्य उपसंचालक डॉ.के.बी. तुमाने, समिती विभाग अधीक्षक एस.डी.रोटके, सहायक शिक्षणाधिकारी प्रिती बंडेवार, लोककर्म विभागाचे कनिष्ठ लिपीक जी.आय. जैन, स्थानिक संस्था व कर विभागातील मोहरीर एन.आर. आंभोरे, कर संग्राहक दिलीप मेश्राम, मलवाहक जमादार ए.एम.माटे, जलप्रदाय विभागातील प्लंबर पी.एन. गेडाम, वित्त विभागातील स्टेनोटायपीस्ट आर.टी. पाटील, अग्निशमन विभागातील फायरमन आर.जी. बैसवारे, फायरमन व्ही.आर.उज्जैनकर, विकास विभागातील ट्रेसर ए.एस.काकीरवार, आरोग्य विभागातील लॉरीड्रायव्हर एन.एस. दामनकर, सहायक शिक्षिका अनघा वेखंडे, सहायक शिक्षिका वैशाली चरपे, सहायक शिक्षिका बेबीनंदा पूरे, सहायक शिक्षिका मंदा माथनकर, सहायक शिक्षिका ललीता पैसाडेली, सहायक शिक्षिका सबीहा खनम अ. सत्तर खॉ, सहायक शिक्षिका प्रेमा दरणे, सहायक शिक्षिका अल्का नखाते, सहायक शिक्षिका साजेदा बेगम, ग्रंथालय विभागातील चौकीदार कम चपराशी अशोक वासनीक, आरोग्य विभागातील चौकीदार गोपीचंद समर्थ, स्थानीक संस्था कर विभागातील चपराशी अरुण वानखेडे, फायलेरिया विभागातील क्षेत्र कर्मचारी लहु किलनाके, शिक्षण विभागातील चपराशी विमल लाटकर, सफाई कामगार छोटीबाई कलसे, मधुकर मसराम, विकास अपराजीत, फुलचंद पाटील, गणेश कामडी यांचा समावेश आहे.