Published On : Thu, Aug 8th, 2019

नगरपरिषद कन्हान-पिपरी विषय समिती चुनाव बिनविरोध संपन्न

Advertisement

कन्हान : – नगरपरिषद कन्हान-पिपरी च्या विषय समिती निवडणुक बिनविरोध संपन्न होऊन स्थायी समिती – चहांदे , बांधकाम – डॉ पाठक, आरोग्य व स्वच्छता – काठोके, पाणी पुरवठा – कुरडकर, शिक्षण /महिला – गजभिये यांची निवड करण्यात आली आहे.

गुरुवार (दि.८) ला नगरपरिषद कन्हान-पिपरी येथे निवडणुक अधिकारी मा जगदीश काटकर उप जिल्हा भु संपादन अधिकारी नागपुर व मुख्याधिकारी सतिश गांवडे यांच्या उपस्थितीत नगरपरिषद कार्यालयात विषय समिती निवडणुक घेण्यात आली. यात स्थायी समिती करिता पद सिध्द अध्यक्ष शंकर चहांदे, बांधकाम सभापती करिता डॉ मनोहर पाठक, आरोग्य व स्वच्छता सभापती- गेंदलाल काठोके, पाणी पुरवठा सभापती- मनोज कुरडकर, शिक्षण व महिला बालकल्याण सभापती – नितुताई गजभिये हयाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असुन विरोधात एक ही अर्ज दाखल करण्यात न आल्याने निवडणुक अधिकारी मा जगदीश काटकर हयानी स्थायी समिती पदी – शंकर चहांदे, बांधकाम सभापती – डॉ मनोहर पाठक, आरोग्य व स्वच्छता सभापती – गेंदलाल काठोके, पाणी पुरवठा सभापती – मनोज कुरडकर, शिक्षण व महिला बालकल्याण सभापती – नितु गजभिये हयाची बिनविरोध निवड करण्यात आली.

Advertisement
Advertisement

या निवडणुकी करिता सत्ता पक्षाचे १२ नगरसेवक, नगरसेविका तर विरोधी पक्षाचे एकमेव नगरसेवक राजेश यादव उपस्थित होते. विषय समिती निवडणुक बिनविरोध व शांततेत संपन्न करण्यात आल्या बद्दल नगरसेवक अजय लोंढे, राजेश शेंदरे, माजी नगराध्यक्षा व नगसेविका अँड आशाताई पनीकर, संगिता खोब्रागडे, अनिता पाटील, सुषमा चोपकर, लक्ष्मीताई लाडेकर, राखी परते आदीने नव्याने विषय समिती सभापती पद्दी निवड झाल्या बद्दल चहांदे, पाठक, काठोके, कुरडकर व नितुताई गजभिये यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement