Published On : Thu, Aug 8th, 2019

‘महापौर चषक’ वंदे मातरम् समूहगान स्पर्धा आजपासून

Advertisement

महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते उद्धाटन

Mayor Nanda Jichkar

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाद्वारे आयोजित ‘महापौर चषक’ वंदे मातरम् समूहगान स्पर्धेला उद्या शुक्रवार (ता.९)पासून सुरूवात होत आहे. ९ ते १४ ऑगस्ट दरम्यान स्पर्धेचे उद्या शुक्रवारी सकाळी १० वाजता झाशी राणी चौकातील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे.

यावेळी शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, उपसभापती मनिषा कोठे, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर आदी प्रामुख्याने उपस्थित राहतील.

‘महापौर चषक’ वंदे मातरम् समूहगान स्पर्धा शहरातील सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा तीन गटात होणार असून पहिल्या गटात इयत्ता ९वी ते १०वी, दुस-या गटात इयत्ता ६वी ते ८वी व तिस-या गटात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. स्पर्धेसाठी प्रवेश नि:शुल्क असून स्पर्धेची प्राथमिक फेरी झाशी राणी चौकातील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात होईल. इयत्ता ९वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांच्या गट क्रमांक एकची प्राथमिक फेरी ९ ऑगस्टला तर इयत्ता ६वी ते ८वी च्या विद्यार्थ्यांची प्राथमिक फेरी १० ऑगस्ट आणि इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची प्राथमिक फेरीतील स्पर्धा १३ ऑगस्टला होणार आहे. तिन्ही गटातील स्पर्धा सकाळी ९ वाजता होईल. स्पर्धेची अंतिम फेरी १४ ऑगस्टला सकाळी ९ वाजता सिव्हील लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह पार पडेल.