Advertisement
अमरावती : प्लास्टिकबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत अमरावती महानगरपालिकेने इतवारा बाजार परिसरात विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली. या कारवाईत १,९२५ किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले असून, जप्त मालाची अंदाजे किंमत ३ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी संबंधित दोन व्यावसायिक आस्थापनांवर प्रत्येकी मिळून १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई महापालिका आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त (२) शिल्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
महानगरपालिकेने नागरिक आणि व्यापाऱ्यांना प्लास्टिकबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर, साठवणूक, विक्री आणि वाहतुकीविरोधात भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.





