Published On : Tue, Nov 30th, 2021

मनपा-OCW ची नेहरू नगर झोन मधील वार्षिक जलकुंभ स्वच्छता मोहीम

नेहरू नगर झोन : खरबी जलकुंभ स्वच्छता २ डिसेंबर, सक्करदरा -१, डिसेंबर ३ आणि सक्करदरा-२ डिसेंबर ४ ला

नागपूर : नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपल्या स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या वचनबद्धता अनुसरत दरवर्षीप्रमाणे यंदाही जलकुंभ स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. मनपा-OCW दरवर्षीच नागपुरातील सर्व जलकुंभ वर्षातून एकदा स्वच्छता करीत असते. हि परंपरा मनपा-OCW ने २०१२ पासून नित्यनियमाने सुरु केलेली आहे. नेहरू नगर झोन अंतर्गत खरबी जलकुंभ स्वच्छता २ डिसेंबर, सक्करदरा -१ जलकुंभ , डिसेंबर ३ आणि सक्करदरा-२ जलकुंभ डिसेंबर ४ ला स्वच्छता करण्यात येतील जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान स्वच्छ करण्यात येतील. या जलकुंभ स्वच्छतेमुळे तेथील भागात पाणीपुरवठा बाधित राहील.

Advertisement

ह्या जलकुंभ स्वच्छता शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

२ डिसेंबर (गुरुवारी ) रोजी खरबी जलकुंभावरून पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:
खरबी जलकुंभ: Orange नगर, चैत्नेश्वर नगर अनमोल नगर, राधाकृष्ण नगर, गिद्दोबा नगर

३डिसेंबर (शुक्रवारी ) रोजी सक्करदरा -१ जलकुंभावरून पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:
सक्करदरा-१ जलकुंभ: न्यू सुभेदार नगर, बीडीपेठ , राजीव गांधी नगर, द्वारका नगर, आशीर्वाद नगर, बँक कॉलोनी, भांडे प्लॉट, सोळंकी वाडी आणि इतर भाग

४ डिसेंबर (शनिवारी ) रोजी सक्करदरा -२ जलकुंभावरून पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग:
सक्करदरा-२ जलकुंभ: महा लक्ष्मी नगर, श्री नगर, जवाहर नगर आणि लादीकर ले आउट

ह्या जलकुंभ स्वच्छता शटडाऊन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

अधिक माहिती करिता मनपा-OCW टोल फ्री नंबर १८००२६६९८९९ वर नागरिक केव्हाही संपर्क करू शकतात.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement