नागपूर: महाराष्ट्राचे कोल्हापूर व सांगली जिह्यातील पुरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने रुपये २० लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नगरीच्या मा.महापौर श्रीमती नंदा जिचकार यांनी मा.मुख्यमंत्री श्री. देवेन्द्र फडणवीस यांना रामगिरी या शासकीय निवासस्थानी सुपुर्द केला.
कोल्हापुर व सांगलीत पुरामुळे हजारो लोकांवर जे संकट आस्मानी कोसळले त्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्राची जनता समोर येत आहे. नागपूर महानगरपालिकेने सुध्दा या कार्यात मनपाच्या निधीतून २० लक्ष रुपयाचा निधी पुरग्रस्तांसाठी दिला. मुख्यमंत्री श्री.देवेन्द्र फडणवीस यांनी या निधीसाठी नागपूर महानगरपालिकेचे कौतुक केले आहे.
यावेळी महापौरांच्या समवेत आमदार सर्वश्री प्रा.अनिल सोले, गिरीश व्यास, कृष्णा खोपडे, उपमहापौर श्री. दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती श्री.प्रदीप पोहाणे, माजी महापौर प्रवीण दटके, माजी स्थायी समिती सभापती व ज्येष्ठ सदस्य श्री. दयाशंकर तिवारी आदी उपस्थित होते

