Published On : Wed, Sep 11th, 2019

स्थायी समिती सभापतींनी केली रेशीमबाग मैदानाची पाहणी

नागपूर: रेशीमबाग येथील मैदानावर मोठया प्रमाणात पाणी साचल्यामुळे चिखल झालेला आहे. त्यामुळे आज सकाळी या मैदानाची पाहणी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे व माजी महापौर प्रवीण दटके यांनी केली.

दरवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजया दशमी या मैदानावर घेण्यात येतो. त्यामुळे याठिकाणी येणा-या स्वयंसेवक व नागरिकांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने २८ सप्टेंबर पावेतो मैदानाची साफ-सफाई करावी. आवश्यक ती डागडुगी करावी असे निर्देश यावेळी स्थायी समिती सभापतींनी दिले.

यावेळी ज्येष्ठ नगरसेवक डॉ. रवींद्र (छोटू) भोयर, रा.स्व. संघाचे महानगर सहकार्यावाह रवींद्र बोकारे, हेडगेवार स्मारक समितीचे अजय जलतारे, ना.सु.प्रचे मुख्य अभियंता सुनील गुज्जलवार, कार्य. अभियंता संजय चिमुरकर, विभागीय अधिकारी अनिल राठोड, सहा. अभियंता संदीप राऊत, म.न.पा.चे आरोग्यधिकारी डॉ. सुनील कांबळे, कार्य. अभियंता अविनाश बाराहाते, उपअभियंता कृष्णकुमार हेडाऊ, विभागीय स्वच्छता अधिकारी डी.एम. कलोडे आदि उपस्थित होते.