Published On : Mon, Jun 22nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

मनपा आणि वृक्षित फॉउंडेशन ने 12,262 किलो तर सेव सोनेगाव आमराई ग्रुप ने अंदाजे 1500 किलो कचरा ह्या आमराई तुन काढला

Advertisement

नागपूर:उपराजधानीच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणाऱ्या तसेच 300 वर्ष जुन्या भोसले कालीन सोनेगाव आमराई ला आता पूर्णतः नवसंजीवनी मिळालि आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आवाहनानंतर वृक्षीत फाउंडेशन तसेच सेव सोनेगाव आमराई ग्रुप ने सोनेगाव आमराई स्वच्छता अभियान दिनांक जून 5 ते जून 21 पर्यंत हाती घेतले होते आता ती संपूर्णपणे कचरा मुक्त झाली आहे..ह्या तरुणाई ने मनपा स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे आणि वृक्षित ग्रोप् च्या अपर्णा रायकवाड, लोकेश थोटा,यश सरपोतदार, रित्विक साव्हणे आणि उर्वील धुर्वे च्या मार्गदर्शनात एकत्र येत गेल्या 16 दिवसात जवळपास 12, 262 किलो कचरा ह्या भागातून काढून…आमराई ला कचरामुक्त केले

ह्या कामाकरिता आज महानगरपालिकेने वृक्षित फाउंडेशन चा सत्कार देखील केलेला आहे.तसेच सेव सोनेगाव् आमराई ग्रुप ने देखील सचिन द्रवेकर ह्यांच्या मार्गदर्शनात गेले 2 महिन्यापासून जवळपास 1500 किलों कचरा आतापर्यंत काढला आहे. ह्या भागातील भोसलेकालीन बाराव (विहीर) देखील स्वच्छ करण्यात आली आहे ( त्यातूनच हजारो किलो बाटल्या निघाल्या होत्या)येथे उल्लेखनिय आहे की हा कचरा दारू आणि बियर बॉटल ह्यांचे वजन सोडून आहे.

Gold Rate
Aug 14 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,32,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

येथे उल्लेखनीय आहे की ह्याच आमराईत सेव सोनेगाव आमराई ग्रुप चे वरिष्ट नागरिक सदस्य दर रविवारी कचरा काढण्याचे काम करीत असतात . जवळपास दर आठवड्याला 10 पोते कचरा निघतोच. आता तर काही वरिष्ठ नागरिक सदस्य दररोज एक पोते भरून कचरा वेचतात (आमराई च्या उजव्या भागातून ..हनुमान मंदिर परिसरातून). त्या कचऱ्याचे तर मोजमाप नाहीच. अगदी 2 दिवसाआधी निरनिराळ्या दारूच्या बॉटल सेव आमराई ग्रुप च्या वरिष्ठ नागरिकांनी काढल्या होता..

सोनेगाव आमराई हा परिसर निसर्ग रम्य आणि मुख्य रस्त्याच्या बरच दूर असल्याने तरुण मंडळी , कॉलेज विद्यार्थी येथे वाढदिवस किंवा इतर कार्यक्रम साजरे करतात . मात्र कार्यक्रम साजरे करत असताना जो कचरा करतात त्याने ह्य भोन्सलेकालीन विहिरीचेच नाही तर भोन्सलेकालीन आमराई चे देखील प्रचंड नुकसान होत आहे.

Advertisement

असामाजिक तत्व येथे भर दुपारी आणि रात्री येऊन दारू पितात आणि कचरा करून जातात. हाच कचरा दर रविवारी उचलून परिसर नेहमीच स्वछ ठेवायचा असे आता ह्या भागात येणाऱ्या वरिष्ठ तसेच युवा नागरिकांनी ठरविले आहे.
नागपूर मनपा, वृक्षित फाउंडेशन तसेच सेव सोनेगाव आमराई आमराई ग्रुप च्या सर्व वरिष्ठ तसेच युवा सदस्यांची ह्या निसर्गरम्य् भागात

येणाऱ्या सर्व तरुणाई, असामाजिक तत्वाना सुद्धा विनंती आहे की त्यांनी एक तर कचरा आणि नये, ह्या निसर्ग रम्य परिसर आणी विहिरीला
आणखी दूषित नये आणि किंवा आपल्या सोबत कचऱ्याची विल्हेवट लावण्यासाठी काही bag सोबत आणून कचऱ्याची विलहेवाट लावावी… लवकरच महानगर पालिका येथे मोठे garbage बीन्स लावणार आहे..

Advertisement
अमरावती में उत्साह से मना 80 वां स्वतंत्रता दिवस #vidarbhanews #maharashtranews #newsupdate #news

अमरावती में उत्साह से मना 80 वां स्वतंत्रता दिवस #vidarbhanews #maharashtranews #newsupdate...

ओबीसी की जातिवार जनगणना पर बावनकुले का बड़ा बयान #Bawankule #OBCJanaganana #NagpurNews #News

ओबीसी की जातिवार जनगणना पर बावनकुले का बड़ा बयान #Bawankule #OBCJanaganana #NagpurNews...

तिरंगे की रोशनी में जगमगाई मनपा इमारत #maharashtranews #vidarbhanews #newsupdate #news

तिरंगे की रोशनी में जगमगाई मनपा इमारत #maharashtranews #vidarbhanews #newsupdate #news

26 साल की उम्र सीमा पर आदिवासी छात्रों का विरोध #vidarbhanews #maharashtranews #newsupdate #news

26 साल की उम्र सीमा पर आदिवासी छात्रों का विरोध #vidarbhanews #maharashtranews...

चंद्रपुर में उत्साह से मना 80 वां स्वतंत्रता दिवस #vidarbhanews #maharashtra #newsupdate #news

चंद्रपुर में उत्साह से मना 80 वां स्वतंत्रता दिवस #vidarbhanews #maharashtra #newsupdate...

जाति आधारित जनगणना पर बावनकुले का बड़ा दावा #vidarbhanews  #maharashtranews #newsupdate #news

जाति आधारित जनगणना पर बावनकुले का बड़ा दावा #vidarbhanews #maharashtranews #newsupdate #news

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges