Published On : Fri, Mar 26th, 2021

मनपा कॉन्ट्रॅक्टर वेलफेअर असोसिएशन च्या सभासदांची कार्यकारी समितीच्या विरोधात धर्मदाय आयुक्तांकडे अपील दाखल

नागपुर – १४ ऑगस्ट २०२० रोजी समितीचा कार्यकाळ संपून सुद्धा अध्यक्ष व सचिव यांनी हेतूपुरस्सर निवडणूका पुढे ढकलल्या व सदर संदर्भात कुठलीही परवानगीआयुक्त यांचेकडून प्राप्त करण्यात आलेली नाही.

त्यामुळे सर्व कॉन्ट्रॅक्टर लोकांना त्रास होत असून संस्थेचा कारभार विस्कळीत झालेला आहे. सदर बाबीचा गांभीर्य लक्षात घेता संस्थेतील सदस्यांनी माननीय धर्मदाय आयुक्त यांचे कार्यालयात सप्टेंबर महिन्यात निवेदन दाखल केले परंतु त्यावर कुठल्याही न्याय-निवाडा करण्यात आला नाही.

तेव्हा कायदेशीर बाबींचा विचार करता काही सभासदांनी धर्मदाय आयुक्त नागपूर कार्यालयात अपील दाखल करण्यात आली आहे त्यासंदर्भात अध्यक्ष व सचिव यांना नोटीस बजावण्यात आली. 24.03.2021 चे सुनावणीत अध्यक्ष सचिव यांना 12 एप्रिल 2021 पर्यंत त्यांचे म्हणणे काय मुदत देण्यात आली आहे.

सदर निवडणूक पुढे काडे करण्यात आली याबद्दल कुठल्याही प्रकारे सभा घेऊन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीत्या सभासदांना कळविण्यात आलेले नाही. याचिकाकर्त्यांतर्फे अडवोकेट गौरव खोंड हे बाजू सांभाळत आहेत.