Published On : Wed, Jun 27th, 2018

मल्टिप्लेक्समध्ये ५ रुपयांचे पॉपकॉर्न २५० रुपयांना का?:उच्च न्यायालय

Advertisement

bombay-high-court

मुंबई : मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांवर राज्य सरकारचे नियंत्रण का नाही, ५ रुपयांचे पॉपकॉर्न २५० रुपयांना का?, असा सवाल हायकोर्टाने विचारला. मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या दरावरुन मुंबई हायकोर्टाने बुधवारी राज्य सरकारवर ताशेरे ओढले.

आम्ही सेवा व लक्झरी पुरवतो त्यामुळे या वस्तू महाग असल्याची बाजू मल्टिप्लेक्सचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या वकिलांनी मांडली. तुम्ही ताज व ओबेरॉयसारख्या हॉटेलांमध्ये १० रुपयांना चहा विकायला सांगू शकाल का असा सवाल उपस्थित करत त्यांनी महागड्या खाद्यपदार्थांचं समर्थन केले .

जर बाहेरचे खाद्यपदार्थ सुरक्षेच्या कारणाखाली ग्राहकांना आणता येत नसतील तर या पदार्थ्यांच्या दरांवर सरकारचे नियंत्रण नको का, असा सवाल कोर्टाने विचारला.