Published On : Fri, Feb 19th, 2021

सुटीच्या दिवशी महावितरण वीज देयके स्वीकारणार

नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात सुमारे १९० वीज बिल भरणा केंद्र


नागपूर: महावितरणकडून थकबाकीदार वीज ग्राहकांकडून वीज देयकाची वसुली मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे.

थकीत वीज देयकाची रक्कम भरू न शकलेल्या वीज ग्राहकांना वीज बिल भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील सुमारे १९० वीज बिल भरणा केंद्र शनिवार आणि रविवारी सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली आहे.

Advertisement

वीज बिल केंद्र शिवाय वीज ग्राहकांना महावितरण मोबाईल अँप आणि ऑनलाईन द्वारे वीज देयकाची रक्कम भरता येते. महावितरण मोबाइलला अँप गुगल प्ले स्टोरमधून डाऊन लोड करता येते. महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून वीज ग्राहक नेट बँकिंग, डेबिट अथवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून वीज देयकाचे पैसे भरू शकतात.

Advertisement

विविध पेमेंट वॉलेटचा उपयोग करून घरबसल्या विजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधाही ग्राहकांना उपलब्ध आहे. ग्राहकांनी अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून आपल्या चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement