Published On : Sat, Oct 14th, 2017

शहराच्या पाणी समस्येवर महावितरणची उपाययोजना

Advertisement

नागपूर: नागपूर शहराला पाणी पुरवठा करण्याऱ्या नवेगाव खैरी धरणातून अखंडित वीज पुरवठा मिळाला तर विना व्यत्यय पाणी पुरवठा होऊ शकतो. शहरातील नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन महावितरण कडून पारशिवनी- नवेगाव खैरी या १२ किलोमीटर लांबीच्या वीज वाहिनीतुन करण्याचा निर्णय घेतला आहे.

या अगोदर नवेगाव खैरी येथील वीज उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाला की नागपूर शहरातील पाणी पुरवठा बाधित होत होता. सदर वीज वाहिनी २८ किलोमीटर लांबीची असून घनदाट जंगलातून जात असल्याने यातील बिघाड दुरुस्ती साठी बराच कालावधी लागत होता. तसेच या ठिकाणी अन्य कोणतीही पर्यायी वीज वाहिनी नसल्याने अडचण निर्माण झाली होती.

महावितरणचे नागपूर परिमंडळ कार्यालयाचे मुख्य अभियंता रफिक शेख यांनी ग्रामीण मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे आणि सावनेर विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता डी. एन. साळी यांना सविस्तर अहवाल करावा असे निर्देश दिले. या नंतर या प्रस्तावस मंजुरी देण्यात आली आहे. पारशिवनी- नवेगाव खैरी ही १२ किलोमीटर लांबीची असून एस्प्रेस फीडरवर आहे यामुळे या वाहिनीतून अखंडित वीज पुरवठा करणे महावितरणला शक्य होणार आहे.

पारशिवनी- नवेगाव खैरी या वीज वाहिनीवर पावसाळ्याच्या काळात मोठ्या प्रमाणात वीज पडून इन्सुलेटर फुटतात. हा जुना अनुभव लक्षात घेऊन महावितरणकडून या वीज वाहिनीवर पॉलिमर इन्सुलेटर लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वीज पडून वाहिनी बंद होणे. या प्रकाराला आळा बसणार आहे.