Published On : Fri, Feb 19th, 2021

महावितरण महा कृषी ऊर्जा अभियान- २०२० उमरेड विभागातील १३० शेतकऱ्यांनी केला १७ लाखाचा भरणा

नागपूर: कृषी पंपाच्या देयकाच्या थाबाकीतून मुक्ट्स होण्यासाठी महावितरणकडून सुरु करण्यात आलेल्या महा कृषी ऊर्जा अभियान- २०२० ला शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळू लागला आहे. महावितरणच्या उमरेड विभागातील पाचगाव,वेलतूर,कुही आणि उमरेड येथे घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात १३० शेतकऱ्यांनी एकरकमी १७ लाखाचा भरणा करून केला. नागपूर परिमंडलातील २ हजार ६९५ शेतकऱ्यांनी २ कोटीपेक्षा जास्त रक्कम भरून थकबाकीतून मुक्तता करून घेतली आहे.

महावितरणचे नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी एकरकमी भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करून , अन्य थकबाकीदार शेतकऱ्यांनी यांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.

पाचगाव येथे झालेल्या मेळाव्यात ३७ शेतकऱ्यांनी ५लाख ४५ हजार रुपयांचा एक रकमी भरणा केला. यावेळी पाचगाव ग्राम पंचायतच्या सरपंच उषा ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता ठाकरे, पंचायत समिती सदस्या प्रियांका लोखंडे उपस्थित होत्या. यावेळी एकरकमी कृषिपंपाच्या देयकाची थकबाकी असलेली ३५ हजार रुपए भरणाऱ्या श्रीमती चंद्रभागा वानखेडे यांचा उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कुही येथे झालेल्या मेळाव्यात कुही पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शिवणकर, उपसभापती वामन श्रीरामे, तितूरचे सरपंच घोडे पाटील, अकोला ग्राम पंचायतचे सरपंच गजानन धांडे,सिलाई ग्राम पंचायतचे सरपंच लालभाऊ दंडारे, उपस्थित होते. तितूरचे सरपंच घोडे पाटील यांनी ९५ हजार रुपयांचा एकरकमी भरणा केला. वेलतूर येथे झालेल्या मेळाव्यात सरपंच ग्राम पंचायत आम्भोरा राजू कुकडे यांनी सौर प्रकल्पाकरिता १२ एकर शासकीय जागा देणेचा ग्रामपंचायतचा ठराव प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांना हस्तांतरित केला.उमरेड येथे झालेल्या मेळाव्यात उमरेड नगर पालिकेच्या नगराध्यक्षा विजयालक्ष्मी भदोरिया, नगरसेवक सतीश चौधरी, उमेश हटवार उपस्थित होते.

हरि महल्ले, कीर्तिराव खोब्रागडे,अशोक देशमुख,धनराज धरमोडे, माधव झोडे,दिलीप राऊत,श्रावण पराते,वंदना आमले,रामचंद्र केराम,कृषभ झोडे, गुणवंत भोयर,सुधाकर गाडबैल ,आशिष गाडबैल, धर्मपाल मेश्राम, विलास भोयर, जीवन गिरे,दौलत पिल्लेवान,नारायण मगरे, वासुदेव कासवलकर,भगवान हाटे, अशोक गुप्ता, चंद्रभागा वानखेडे , जयराम तोतडे, सोपान इंगळे, विठ्ठल सोनटक्के, गुलाब पाटील,दिलेश्वर खडसे, दीपक पाटील,सुखदेव झिलपे, सागर इंगळे, ज्ञानेश्वर वंजारी,महेंद्र सोनटक्के,विवेक बर्डे या शेतकऱ्यांनी एकरकमी भरणा केला. मेळावा यशस्वी करण्यासाठी उमरेड विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप घाटोळ, उमरेड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता दिलीप राऊत, कुही उप विभागाचे उपकार्यकारी अभियंता भूपेंद्र रंधये यांनी मेहनत घेतली.